मुलगी रोज फोन करायची, डॉक्टर म्हणायचे वडील बरे आहेत, कारण समोर आल्यावर कुटुंबीय हादरले

कोरोना काळात अनेक डॉक्टरांचा आणि रूग्णालयांचा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे. असे अनेक व्हिडीओ सोशल मिडीयावर रोज व्हायरल होत असतात. रूग्ण जीवंत रूग्णाला मृत घोषित करण्याच्या अनेक घटना घडलेल्या आपण पाहिल्या आहेत.

अशात आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत १५ दिवस आधीच मेलेल्या रूग्णाच्या नातेवाईकांना अशी माहिती दिली जात होती की रूग्ण अगदी बरा आहे. मात्र जेव्हा रूग्णाची मुलगी हॉस्पिटलमध्ये पोहोचली तेव्हा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

ही घटना उत्तर प्रदेशच्या एलएलआरएम मेडीकल कॉलेजमध्ये घडली आहे. गुरूवारी सर्वांना असे कळाले की रूग्णाचा मृत्यु २३ एप्रिललाच झाला होता. मेडीकल प्रशासनाने असा दावाही केला आहे की त्याच काळात मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

मेडीकल कॉलेजच्या प्राचार्यांनी आपली चूक मान्य केली आहे आणि त्यासाठी एक चौकशी समिती स्थापन केली आहे. सुरूवातीच्या चौकशीत असा खुलासा झाला की संतोष कुमार यांचा २३ एप्रिलला मृत्यु झाला होता. पोलिसही या प्रकरणाचा तपास करत आहेत.

दरम्यान, २१ एप्रिलला संतोष कुमार सकाळी ११ वाजता हॉस्पिटलमध्ये भरती झाले होते. त्यांची मुलगी शिवांगी हिने दिलेल्या माहितीनुसार, ती दररोज कंट्रोल रूममध्ये फोन करून वडीलांच्या प्रकृतीची चौकशी करायची. तीन मे नंतर तिला काहीच माहिती मिळाली नाही. त्यामुळे तीने थेट मेरठ गाठले.

कोविड वार्डातही तिला तिच्या वडीलांची माहिती मिळाली नाही. मेडिकल कॉलेजच्या प्राचार्यांचे म्हणणे आहे की संतोषच्या नावाने त्याच वेळेस एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. एका नावाचे दोन तरूण असल्यामुळे हा गोंधळ झाला आहे.

कोविड वार्डात संतोष कपूर आणि संतोष कुमार नावाचे दोन तरूण दाखल झाले होते. संतोष कुमार यांचा मृत्यु २३ एप्रिललाच झाला होता. संतोष कपूर यांच्या प्रकृतीची माहिती ते संतोष कुमार यांच्या कुटुंबीयांना देत होते. चौकशीचा रिपोर्ट समोर येताच योग्य ती कारवाई केली जाईल असे कॉलेजचे प्राचार्य ज्ञानेंद्र कुमार यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या
करीना कपूरने विद्या बालनवर केली खूपच घाणेरडी कमेंट, म्हणाली ही जाडी….
मोठा खुलासा! प्रयोगशाळेत आणखी घातक व्हायरस बनवतंय चीन, कोरोनासुद्धा चीननेच बनवला
‘रात्रीस खेळ चाले’ मधील अण्णा नाईक यांच्या खऱ्या पत्नी अभिनेत्रीपेक्षाही दिसतात सुंदर; पहा फोटो
एकेकाळी घरोघरी जाऊन सायकलवर विकले सामान, आज आहे ५ हजार ५२४ कोटींचा मालक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.