लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्यांनो सावधान! रस्त्यावर फिरतेय माणसांना उचलणारी गाडी

देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने धूमाकूळ घातला आहे. त्यामुळे कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी विविध राज्यांनी राज्यभरात लॉकडाऊन करत, नागरीकांवर कडक निर्बंध लादण्यात आले होते.

अशात निर्बंध लावूनही लावूनही लोकं कोरोनाच्या नियम मोडत आहे. अनेकदा समजावूनही लोकं नियम तोडताना दिसत आहे. त्यामुळे पोलिस वेगवेगळ्या पद्धतीने कारवाई करत आहे. काही ठिकाणी तर नियम मोडणाऱ्यांवर केस देखील होत आहे.

असे असताना तेलंगणात कोरोनाच्या संकटाने थैमान घातले आहे. त्यामुळे लॉकडाऊन करण्यात आले आहे. तिथे तर लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्यांना थेट आयसोलेशन वार्डमध्येच पाठवण्यात येत आहे.

तेलंगणात ३० मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. तरी काही लोकं लॉकडाऊनचा नियम मोडत आहे. त्यामुळे थेट नॉन-कोविड आयसोलेशन वॉर्डमध्ये नेण्यात येत आहे. त्यानंतर तिथे नेऊन त्यांना समजावले जाते आणि त्यानंतर त्यांची सुटका केली जाते.

लॉकडाऊनमध्ये नियम मोडणाऱ्या लोकांना शिक्षा देण्यासाठी पोलिस प्रशासन वेगवेगळे पर्याय शोधत आहे. कोणी नियम मोडणाऱ्यांना बेडूक उड्या मारायला लावत आहे, तर कोणी नागिन डान्स करायला.

अशात तेलंगणाच्या पोलिस प्रशासनाने थेट नियम मोडणाऱ्यांसाठी एका गाडीचाच बंदोबस्त केल्या आहे. जो पण नियम मोडताना दिसेल, त्याला ही गाडी धरु नेत आहे आणि त्याला आयसोलेशन वॉर्डमध्ये सोडत आहे. अशा शिक्षेमुळे आता कोणाचीही विनाकारण घराबाहेर पडण्याची हिंमत होत नाहीये.

दरम्यान, तेलंगणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. रोज हजारोंच्या संख्येने रुग्णवाढ होत आहे. त्यामुळे आता तेलंगणातील कोरोना रुग्णांची संख्या ५,६७,५१७ इतकी झाली आहे.

महत्वाच्या बातम्या-

मिर्झापुर सीरीजमधील अभिनेत्यावर आली वाईट वेळ? अक्षरश रस्त्यावर लाडू विकतोय
२४ वर्ष मोठ्या मुलीच्या प्रेमात पडले होते कमल हसन, लग्नही केले पण शेवटी…
कोरोना लसीच्या एका डोसने या महिलेला एका रात्रीत बनवले करोडपती, वाचा नेमके काय घडले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.