राज्यात रुग्णसंख्या वाढत असताना तज्ञ म्हणाले ही तर दिलासादायक बाब, जाणून घ्या तज्ञांचे गणित

काही दिवसांपासून राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे. राज्यात रुग्णसंख्या ६० हजारांच्या आसपास आहे. मागील अनेक दिवसांपासून याच आकडेवारीच्या आजूबाजूला महाराष्ट्रातील रुग्णसंख्या आहे.

ही आकडेवारी जरी वाढत आली तरी एक दिलासादायक बाब तज्ज्ञांकडून व्यक्त केली केली आहे. ६० हजारांच्या आसपास दैनंदिन रुग्णसंख्या स्थिर झालेली असल्याने महाराष्ट्रामध्ये कोरोना लाट उच्चांक गाठल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

त्यामुळे तज्ञांच्या म्हणण्यानुसार सध्याची परिस्थिती ही महाराष्ट्रासाठी वाईटातून चांगली अशी आहे. लवकरच रुग्णसंख्या कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागील आठवडा हा मार्च महिन्यापासून सर्वाधिक स्थिर रुग्ण संख्या असणारा आठवडा ठरला.

आयआयटी कानपूरमधील प्राध्यापक असणाऱ्या मनिंदर अग्रवाल यांनी, महाराष्ट्रात पुढील काही दिवसांमध्ये दैनंदिन रुग्णसंख्येमध्ये घट झाल्याचे आपल्याला पहायला मिळाले, असे मत नोंदवलं आहे. देशातील कोरोना संसर्गासंदर्भातील माहिती गोळा करण्याचे काम अग्रवाल करत आहेत.

आता ही आकडेवारी स्थिर झाली असून यामध्ये लकरच घट होईल असे त्यांनी म्हटले आहे. पुढील काही दिवसांमध्ये छत्तीसगड, आणि मध्यप्रदेश मधील रुग्णसंख्या देखील कमी होईल, असेही मत त्यांनी नोंदवले आहे.

अग्रवाल यांच्या टीमने गेल्या ३ महिन्याचा अंदाज देखील अचूक सांगितला होता. यामुळे आता पुढील अंदाज बरोबर ठरणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लसीकरण देखील आता १८ वर्षांपुढील व्यक्तीला केले जाणार आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.