मोदींमुळेच कोरोनाचा भडका, हिंदू नाराज होऊ नये म्हणुन कुंभमेळा होऊ दिला, बंगालमध्ये रॅली काढल्या

कोरोना परिस्थिती व्यवस्थित हाताळत आली नाही म्हणून जगभरातून आता मोदी सरकारवर टीका केली जात आहे. भारतात सध्या कोरोनाची दुसरी लाट थैमान घालत आहे. ऑक्सिजन पुरवठा, बेड्सची कमतरता, अनेकांचे मृत्यू यामुळे त्यांच्यावर टीका केली जात आहे.

नरेंद्र मोदी आपल्या प्रतिमेबाबत सतर्क असतात. मात्र कोरोना व्हायरसमध्ये त्यांची प्रतिमा खराब होत आहे. फॉरेन प्रेसने त्यांना नायक म्हटले आहे. आपल्या चुकीच्या निर्णयामुळे कोरोना संकट अजून मोठे होत चालले आहे.

फॉरेन प्रेसच्या म्हणण्यानुसार पहिल्या लाटेत चांगल्या प्रकारे कोरोनाचा सामना केला गेला मात्र आता ऑक्सिजन अभावी रूग्ण मरत आहेत. यावर अजूनही काही उपाय केले गेले नाहीत.

तसेच The times london या न्यूज पेपरमधून देखील मोदींवर जोरदार टीका करण्यात आली आहे. यामध्ये भारतात रोज ३ लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. या संकटाला त्यांनी जास्त महत्व दिले नाही, यामुळे संकट गंभीर झाले आहे, असे म्हटले आहे.

तसेच ग्लोबल प्रेसमधून देखील जोरदार टीका करण्यात आली आहे. यामध्ये खलनायक म्हणून त्यांचा उल्लेख केला आहे, हिंदू नाराज होऊ नये म्हणून, कुंभमेळा होऊन दिला, आणि बंगालमध्ये रॅली काढल्या, यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली. याचबरोबर जगभरातील अनेक वृत्तसंस्थानी यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. यामधून मोदींनाच जनतेचा शत्रू म्हटले आहे.

एकाबाजूला मोठ्या सभा घ्यायच्या आणि दुसरीकडे काळजी घेण्याचे आवाहन करायचे, यामुळे देशात त्याच्याविरोधात असंतोष निर्माण झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील मोठ्या सभा घेऊन रॅली काढल्या, यामुळे नियम फक्त जनतेसाठीच आहेत का.? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

ताज्या बातम्या

तज्ञ म्हणतात, तुम्ही घरात असून पण तुम्हाला होऊ शकतो कोरोना; बचावासाठी घ्या ही काळजी

सुजय विखेंची धाडसी मोहीम; नगरसाठी १० हजार रेमडिसीवीर स्वत: खाजगी विमानाने आणल्या

बिग ब्रेकींग! अनिल देशमुखांना अटक? १०० कोटींच्या खंडणी प्रकरणी सीबीआयने घेतलं ताब्यात

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.