आनंदाची बातमी! ‘या’ तारखेला महाराष्ट्रातील कोरोनाचा कहर संपणार; टास्क फोर्सने दिली माहिती

मुंबई । गेल्या वर्षभरापासून आपलं राज्य कोरोनाशी दोन हात करत आहे. आता देखील कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे प्रशासन हतबल झाले आहे. अनेक पर्याय अवलंबून देखील रुग्ण वाढत आहेत, असे असताना आता एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे.

कोरोना लवकरच हद्दपार होणार असून महाराष्ट्रातील टास्क फोर्सचे सदस्य असलेल्या डॉक्टरांनी कोरोना संदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाची लाट ही पूर्णपणे आटोक्यात येईल, असे वक्तव्य टास्क फोर्सच्या डॉक्टरांनी केले आहे.

यामुळे कोरोनातून लवकरच बाहेर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून देशातील नागरिक कोरोनाशी लढा देत आहेत. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

तसेच केंद्र सरकारने १ मे पासून १८ वर्षांच्यावरील सर्व नागरिकांना कोरोनाची लस दिली जाणार असल्याची घोषणा केली आहे. यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. यासाठी वेळ देखील ठरवून देण्यात येणार आहे. याबाबत टास्क फोर्सच्या डॉक्टरांनी माहिती दिली आहे.

राज्यात लसीचा तुटवडा असला तरी सोमवारी एकाच दिवसात महाराष्ट्रात तब्बल पाच लाखांहून अधिक नागरिकांना कोरोना लस देण्यात आली. लवकरच लसीकरण झाले तर कोरोनाचा धोका कमी होणार आहे.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याने अनेकांना ऑक्सिजन बेड, इंजेक्शन देखील उपलब्ध होत नाहीत. यामुळे अनेकांचे जीव देखील गेले आहेत. प्रशासन युद्ध पातळीवर काम करत असून कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

ताज्या बातम्या

गुड न्युज! फक्त ४ लाखात ह्युंदाईची नवी कोरी अलिशान SUV कार मिळणार; जाणून घ्या फिचर्स

सुजय विखेंनी दिल्लीवरून आणलेल्या इंजेक्शनप्रकरणी हायकोर्ट आक्रमक, कारवाईचे दिले आदेश  

सुजय विखेंनी दिल्लीवरून आणलेल्या इंजेक्शनप्रकरणी हायकोर्ट आक्रमक, कारवाईचे दिले आदेश  

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.