येत्या १५ ते २० दिवसांत कोरोनाचा विस्फोट?धक्कादायक आकडेवारीसह तज्ज्ञांनी केली चिंता व्यक्त

देशभरात कोरोना दिवसेंदिवस पसरत चालला आहे.  देशात रोज हजारोंनी रुग्ण भेटत आहे. गेल्या २४ तासात तर देशात ८१,४६६ कोरोना रुग्ण मिळाले आहे, तर ४६९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, आता अशा परिस्थितीमुळे तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.

सध्याच्या परिस्थितीचा अंदाज घेत येत्या १५ ते २० दिवसांत कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रसार होण्याची शक्यता आहे, अशी चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

आयआयटी कानपूरचे प्राध्यापक मनींद्र अग्रवाल यांनी गणितीय मॉडेलच्या आधारे काही निरीक्षणे नोंदवली आहे. त्यामध्ये येत्या १५ ते २० दिवसांची कोरोनावरील धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

येत्या १५ ते २० दिवसात रोज ८० ते ९० हजार कोरोना रुग्णांची भर पडणार आहे, असे म्हणत मनींद्र अग्रवाल यांनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच रुग्णांची संख्या यापेक्षा सुद्धा जास्त असू शकते,  त्यानंतर त्यामध्ये घसरण होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, राज्यात पण कोरोनाच्या रुग्णात वाढ होत चालली आहे. राज्यात गुरुवारी एकाच दिवशी  ४३ हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. कोरोनाचे रूग्ण वाढत असल्यामुळे आता राज्य सरकारने नवे निर्बंध सुद्धा घातले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.