कोरोना लस घेण्याबाबत रतन टाटांनी भारतीय नागरीकांना केले ‘हे’ आवाहन

मुंबई | कोरोना महामारीने गेल्या वर्षभरापासून देशात थैमान घातले आहे. देशात कोरोनाची लस लवकारात लवकर उपलब्ध व्हावी. यासाठी ‘भारत बायोटेक’ आणि ‘सिरम’ या दोन कंपन्यांनी देशात लस उपलब्ध केली आहे. कोरोना लसीचे डोस देण्यास काही दिवसांपासून सुरूवात झाली आहे. प्रसिध्द उद्योजक रतन टाटा यांनीही कोरोनावरील लस घेतली आहे.

रतन टाटा यांनी लस घेतल्यानंतर ट्विटरवर ट्विट केले आहे. ते म्हटले की, “मी आज कोरोनावरील लस घेतली आहे. लस घेताना मला कुठलीच वेदना झाली नाही. लवकारात लवकर सर्वांनी लस घेऊन संरक्षण मिळवले पाहिजे.”

रतन टाटा  83 वर्षांचे आहेत. त्यांनी कुठलीही भीती न बाळगता कोरोनावरील लस घेतली आहे. तसेच देशातील प्रत्येक नागरिकाने न घाबरता लस घेण्याचं आवाहन त्यांनी केले आहे.

दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दिल्लीतील एम्स रूग्णालयात भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ लस घेतली आहे. तसेच अनेक राजकीय नेत्यांनी, उद्योजकांनी कोरोनावरील लस घेतली आहे.

महत्वाच्या बातम्या-
बायकोने आधी नवऱ्याला सेक्स व्हिडिओ दाखवले, अन् नंतर त्याचे हातपाय बांधून केले ‘हे’ कृत्य
अबब! भारतात ‘या’ ठिकाणी प्रत्येक सेकंदाला तयार होणार १ इलेक्ट्रीक स्कूटर, OLA उभारणार कारखाना
मोठी बातमी! एमपीएससीची परीक्षा ८ दिवसातच होणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.