कोरोनामुळे घरातील चौघांचा मृत्यू, मुलाच्या जाण्याचा धक्का सहन न झाल्याचे आई-वडिलांचाही मृत्यू

कोरोनामुळे रोज अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. यामध्ये अनेकांची संपूर्ण कुटूंब उध्वस्त झाली आहेत. अनेकांच्या घरातील सर्व लोकांचा कोरोनाने मृत्यू होत आहे. घरातील व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाल्याच्या धक्क्यातून इतर व्यक्तींचा मृत्यू झाल्याची घटना देखील समोर येत आहेत.

अशीच एक घटना उस्मानाबाद जिल्ह्यात घडली आहे. येथील चोराखळी येथील नवले कुटुंबावर नियतीने घाव घातला आहे. कोरोनाने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू एकाच महिन्यात झाल्याची दुःखद घटना येथे घडली आहे.

या घटनेमुळे गावकरी देखील भीती बाळगून आहेत. प्राध्यापक असलेले संजय नवले कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

ही बातमी पुण्यात असलेल्या त्यांच्या आई-वडिलांना कळाली. यामुळे त्यांना एकच धक्का बसला. त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांना देखील कोरोना झाल्याचे दिसून आले आणि त्यांचा देखील कोरोनाने मृत्यू झाला.

त्यानंतर सुनील नवले यांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला. घरातील या चौघांनी मोठा संघर्ष करून विश्व उभे केले होते. त्यांच्या जाण्याने गावाला एकच धक्का बसला. कोरोनाने अशी अनेक कुटुंब उध्वस्त केली आहेत.

दुसऱ्या लाटेत तरुणांचे देखील मोठ्या प्रमाणात मृत्यू होत असून आता तिसरी लाट देखील येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे येणाऱ्या काळात देखील मोठ्या प्रमाणावर काळजी घ्यावी लागणार आहे.

ताज्या बातम्या

कोरोना काळात डबल मास्क वापरणे किती फायदेशीर? जाणून घ्या तज्ञांचा सल्ला..

कोरोना काळात राजकारण करू नका, नितीन गडकरींनी देवेंद्र फडणवीसांना झापले

मोदींच्या आणि इतर नेत्यांच्या रॅलींमुळे भारतात कोरोनाचा उद्रेक; who च्या टाॅपच्या शास्रज्ञांची माहिती उघड

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.