मोठी बातमी! अखेर कोरोनामुळे आयपीएल रद्द, बीसीसीआयची माहिती

गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. असे असताना देखील देशात आयपीएलचे सामने सुरू होते मात्र अनेकांना कोरोनाची लागण झाल्याने आता आयपीएल रद्द करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे.

याबाबत बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी माहिती दिली आहे. कालचा सामना देखील कोरोनामुळे रद्द करण्यात आला होता. यामुळे आता आयपीएल होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते.

अखेर आता हा निर्णय घेण्यात आला आहे. काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती. आतापर्यंत ३ खेळाडूंसह ११ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. यामुळे धोका वाढू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

गेल्यावर्षी देखील देशात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत होते, यामुळे भारताबाहेर ही स्पर्धा पार पडली होती. यावर्षी मात्र बायो बबलची सुरक्षा घेऊन भारतात निवडक शहरात हे सामने खेळवले गेले.

मात्र तरीदेखील कोरोनाने आयपीएलमध्ये शिरकाव केला. यामुळे अखेर ही स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अनेकांनी याबाबत मागणी केली होती.

ताज्या बातम्या

धक्कादायक! बापाने २ वर्षाच्या पोटच्या मुलाला विकलं अन् गर्लफ्रेंडसोबत गेला मजा मारायला

‘या’ झाडाच्या देखभालीचा खर्च आहे १५ लाख; झाडाभोवती असतो २४ तास कडक पहारा

कोरोना आणि हार्ट अटॅक काय आहे सबंध? कस करायचं संरक्षण? जाणून घ्या तज्ञांचा सल्ला

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.