शरद पवारांच्या ‘सिल्व्हर ओक’नंतर गोविंद बागमध्येही कोरोनाचा शिरकाव; 4 कर्मचारी पॉझिटिव्ह

बारामती | राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या बारामतीतील निवासस्थानी कोरोनाचा शिरकाव झाला आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती येथील गोविंद बागेतील निवासस्थानातील 4 कर्मचाऱ्यंना कोरोनाची लागण झाली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानीदेखील काही कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते.

मुंबईत सिल्व्हर ओक येथे कोरोनाचे 16 रुग्ण आढळल्यानंतर शरद पवार यांच्या बारामतीतील गोविंद बाग निवासस्थानातील 50 कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी 4 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे.

हे 4 ही कर्मचारी पवारांच्या शेतात आणि बागेत काम करतात. या 4ही जणांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येत असून त्यांच्या संपर्कातील इतर लोकांचीही कोरोना चाचणी करण्यात येणार असल्याचे समजते. बारामतीतही कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असून आतापर्यंत 473 कोरोना रुग्ण आढळले आहेत.

काही दिवसांपूर्वी शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक येथील घरगुती तसेच कार्यालयीन कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. तेथील 12 कर्मचारी या चाचणीत पॉझिटिव्ह आढळले होते.

त्यामध्ये 3 अंगरक्षकांचा समावेश होता. विशेष म्हणजे स्वतः शरद पवार आणि त्याचे कुटुंबीय कोरोना निगेटिव्ह आढळले होते. त्यानंतर पवार यांच्या संपर्कात आलेल्या 500 जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.