कोरोना रूग्णांवर नियंत्रणाची जबाबदारी सोसायटीची, रूग्ण बाहेर फिरल्यास होणार १० हजार दंड

 

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे राज्य सरकार वेगवेगळ्या गाईडलाईन्स आखत आहे, तसेच नियम मोडणाऱ्या लोकांवर कडक कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे.

अशात कोरोना रुग्ण सोसायट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भेटत आहे. त्यामुळे आता सोसायट्यांबाबत नवीन नियम जारी करण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांनी सोसायटीमध्ये कोरोनाचे पाच रुग्ण मिळाले तर सोसायटीला मिनी कंटेन्मेंट झोन जाहीर करण्याचे आदेश दिले आहे.

तसेच सोसायटीमध्ये नागरिकांच्या माहितीसाठी कोरोना रुग्णांची माहिती दर्शवणारे फलक लावण्यात यावे, तसेच अशा सोसायट्यांमध्ये बाहेरच्या लोकांना बंदी असेल. तसेच कोरोना रुग्णांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी सोसायटीची असेल.

तसेच कंटेन्मेंट झोन घोषित केलेल्या सोसायटीत जर कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यास सोसायटीकडून १० हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. जर त्याच सोसायटीने पुन्हा नियमांचे उल्लंघन केल्यास त्या सोसायटीला २० हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.

दरम्यान, प्रत्येक कंटेन्मेंट झोन घोषित केलेल्या सोसायटी, इमारतीच्या बाहेर पोलीस कर्मचारी ठेवण्यात येणार आहे. तसेच सोसायटीमध्ये फेरीवाले, वृत्तपत्रे, पार्सल घरी पोहचवणाऱ्यांना मनाई असणार आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

डाव उलटला! आता परमबीरसिंगही अडकणार? एनआयए परमबीरांचीच चौकशी करणार; हाजीर हो…

परमीरसिंगांचे सचिन वाझेशी जवळचे संबंध, त्यांनीच वाझेची नियुक्ती केली; आयुक्तांचा अहवाल फुटला

भुक लागली की फक्त बिअर प्यायचा, २ महिन्यातच पठ्याने घटवले १८ किलो वजन

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.