उत्तराखंडमध्ये कोरोनाचा हाहाकार! कुंभमेळ्यानंतर कोरोना रुग्णसंख्या १८०० टक्क्यांनी वाढली

देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. अशात एप्रिल महिन्यात उत्तराखंडमध्ये कुंभमेळ्याच्या आयोजन करण्यात आले होते. मात्र काही दिवसांतरच त्या कुंभमेळ्यात कोरोनाचा शिरकाव झाला होता.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उर्वरीत कुंभमेळा प्रतिकात्मक ठेवण्याची सुचना केली होती. त्यानंतरही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात आणणे कठिण झाले आहे.

एप्रिल महिन्यानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. तसेच कोरोनामुळे मृत्यु होणाऱ्या लोकांचे प्रमाणही वाढले आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार उत्तराखंडमध्ये झालेल्या मृत्युपैकी निम्मे मृत्यु कुंभमेळ्यानंतर झाले आहे. त्यामुळे कुंभमेळ्यामुळे उत्तराखंडमध्ये कोरोनाचे प्रमाण वाढले असल्याची चर्चा आहे.

१ एप्रिलनंतर ७ मे पर्यंत या कालावधीत कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची दिसून येत आहे. तसेच आता या कालावधीमध्ये उत्तराखंडच्या रुग्णसंख्येत १ लाख ३० हजार रुग्ण संख्येने भर पडली आहे.

तसेच उत्तराखंडमध्ये कोरोनामुळे झालेल्या मृत्युपैकी निम्मे म्हणजेच १७१३ मृत्यु हे १ एप्रिल ७ मे च्या दरम्यान झाले आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार एप्रिल महिन्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत तब्बल १८०० टक्कांनी वाढ झाली आहे.

दरम्यान, शुक्रवारी उत्तराखंडमध्ये कोरोना रुग्णसंख्येने उच्चांक गाठला होता. त्या दिवशी ९ हजार ६४२ रुग्ण एकाच दिवशी मिळाले होते. सध्या उत्तराखंडमधील कोरोना रुग्णांची संख्या २ लाख २९ हजार इतकी आहे.

महत्वाच्या बातम्या-

कोरोनाचा हाहाकार! कोरोनामुळे पतीच्या मृत्युनंतर पत्नीने नवव्या मजल्यावरुन उडी मारत जीवन यात्रा संपवली
साऊथच्या प्रसिद्ध अभिनेत्रीला वजन कमी करणे पडले खुपच महागात; गमवावा लागला जीव
भारतातील चहाने या विदेशी महिलेला बनवले करोडपती, वाचा एक रोमांचक कहाणी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.