कोरोनामुळे पतीचा झाला मृत्यू, धक्का सहन न झाल्याने तीन वर्षाच्या लेकरासह पत्नीची आत्महत्या

नांदेड | राज्यात गेल्या वर्षभरापासून कोरोनाने हाहाकार माजवला आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकार निर्बंध लावत आहे. कोरोनाच्या रूग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोनाच्या विळख्यात अनेकांनी जीव गमावले आहे. अशातच नांदेडमध्ये एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे.

नांदेड जिल्ह्यातील लोहा तालूक्यात पतीच्या निधनानंतर पत्नीने तीन वर्षाच्या मुलासह तलावात उडी मारत जीव दिला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आंध्र प्रदेश राज्यातून हे दामपत्य पोटापाण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील लोहा तालूक्यात आले होते.

४० वर्षीय शंकर गंदम यांना त्रास होऊ लागल्याने त्यांनी रूग्णालयात कोरोनाची चाचणी केली होती. त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता. त्यांच्यावर ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला.

पतीचा मृत्यू झाला असल्याचं पत्नी पद्मा यांना समजलं. यामूळे त्यांना जबर मानसिक धक्का बसला. दोन मुलींना घरी ठेवून पद्मा यांनी तीन वर्षाच्या मुलाला घेऊन तलावात उडी मारून आत्महत्या केली आहे. पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.

शंकर गंदम हे मजूरी करून कुटूंबाचा सांभाळ करत होते. गेल्या काही दिवसांपासून ते लोह्याच्या बालाजी मंदीराच्या मागे एका छोट्याशा खोलीत राहत होते. दरम्यान कोरोनामुळे एक हसतं खेळतं कुटूंब उध्वस्त झालं आहे. तर दोन लहान मुली कायमच्या पोरक्या झाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
‘कोरोना मोदींमुळे देशात आला, मोदी पाकिस्तानला लस पुरवतात मात्र राज्यांना देत नाहीत’
“राष्ट्रवादी हुशार, गृहमंत्री गरीब तोंडाचा पाहतात, ज्यामुळे चिल्लर त्याला आणि नोटा मात्र बारामतीला”
पलंगावर झोपायच्या आधी मला ‘या’ गोष्टी हव्या असतात; करिना कपूर सांगितले बेडरूममधील रहस्य
महिला कर्मचाऱ्याला अश्लील मॅसेज करणे पडले महाग, बॉसला चोप चोप चोपून व्हिडिओ केला व्हायरल

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.