“माझ्या आईचा फोन कुणी घेतला असेल तर परत आणून द्या”, चिमुकलीचं पत्र सोशल मीडियावर व्हायरल

कर्नाटक | देशात कोरोनामुळे अनेकांनी आपला जीव गमवला आहे. कुटुंबातील जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याने अनेकांना भावनिक धक्का बसला आहे. सध्या सोशल मीडियावर अवघ्या ९ वर्षांच्या मुलीने लिहिलेलं भावूक पत्र व्हायरल होत आहे. त्या मुलीच्या आईचा १६ मे रोजी कोरोनामुळे मृत्यू झाला होता.

कर्नाटकच्या कोडगू येथील हृतिकक्षाने स्थानिक उपायुक्त, आमदार आणि जिल्हा कोविड रुग्णालयाला हे पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये हृतिकक्षाने आपल्या आईचा हरवलेला मोबाईल शोधून देण्याची विनंती केली आहे. कोरोनामुळे आईचा मृत्यू झाल्यानंतर ती अनाथालयामध्ये राहत आहे.

हृतिकक्षाने पत्रात काय लिहिलं
“माझ्या आई आणि वडिलांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर माझ्या आईची तब्येत बिघडली आणि तिली माडिकेरी कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. माझे वडील व मी घरी होतो आणि त्यावेळी बाहेर जाऊ शकलो नाही”.

“माझे वडील रोजंदारीवर कामाला आहेत आणि आम्ही शेजाऱ्यांनी केलेल्या मदतीमुळे हा दिवस पाहू शकत आहे. माझ्या आईचे १६ मे रोजी निधन झाले. माझ्या आईचा मोबाईल फोन तिच्याबरोबर असणाऱ्या कोणीतरी घेतला आहे”.

“मी आईला गमावल्याने मी अनाथ झाले. त्या फोनमध्ये माझ्या आईच्या बऱ्याच आठवणी आहेत. मी विनंती करते की ज्यांनी फोन घेतला आहे किंवा ज्यांना सापडला असेल त्यांनी तो अनाथालयामध्ये परत आणून द्या”. अशी भावूक विनंती करणारे पत्र हृतिकक्षाने लिहिले आहे.

“माझी पत्नी टी के प्रभाचे १६ मे रोजी निधन झाले. तिचे इतर सामान आमच्याकडे दिले आहे. पण तिचा मोबाईल त्यातून गायब आहे. आम्ही त्या नंबरवर कॉल करण्याचा प्रयत्न केला पण फोन बंद आहे” अशी माहिती हृतिक्षाचे वडील नवीन कुमार यांनी दिली आहे.

तसेच, “हृतिक्षाला आईचा मोबाईल न मिळाल्याने ती सारखी रडत आहे. हृतिक्षाने आमच्या कुटुंबाच्या अनेक आठवणी त्या फोनमध्ये सेव्ह केल्या आहेत. तिने तिच्या आईचा फोन वापरुन ऑनलाइन वर्गात शिक्षण घेतले आहे. आता तो फोन शोधणे किंवा नवा फोन खरेदी करणे माझ्यासाठी शक्य नाही.” असेही हृतिक्षाच्या वडिलांनी इंडियन एक्सप्रेससोबत बोलताना सांगितले.

दरम्यान, हृतिकाचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्याची दखल घेतली आहे. यावर कर्नाटकचे डीजी आणि आयजीपी प्रवीण सूद यांनी आम्ही मोबाईल शोधण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे. पत्र वाचून सोशल मीडिया लोक भावूक होताना पाहायला मिळत आहेत.

महत्वाच्या बातम्या-
आईची माया! ऑक्सिजनवर असलेली ती माऊली करतेय स्वयंपाक; फोटो पाहून तुम्ही कराल कौतूक
भुख लागली असेल बिनधास्त खा, पैसे देऊ नका; सोशल मीडियावर तमिळनाडुच्या फळविक्रेत्याची चर्चा
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने घातला धुमाकूळ?; ‘या’ ठिकाणी तब्बल ३४१ मुलांना झाला कोरोना

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.