मानलं बुवा; घरात जागा नसल्यामुळे पठ्ठ्याने झाडावर बसून काढला विलगीकरणाचा कालावधी

देशभरात कोरोना विषाणू मोठ्या प्रमाणावर वाढत चालला आहे. हैद्राबाद मधील नालगोंडा जिल्ह्यात पण कोरोना विषाणू वाढत चालले आहे. तिथे कोरोना रुग्णांना विलगीकरणाला जागा नसणे ही फार मोठी समस्या निर्माण झाली आहे.

अनेक कुटुंब येथे एकाच खोलीत राहत असून त्यांना विलगीकरणात राहायला मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. नालगोंडामधील एका १८ वर्षाच्या मुलाने विलगीकरण कालावधी कोठे काढला हे वाचून तुम्ही पण चकित झाल्याशिवाय राहणार नाही.

तेथे राहणाऱ्या मुलाने स्वतःसाठी झाडावरच विलगीकरण कक्ष उभारला होता. येथील शिवा या तरुणाचा कोविड अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्याला गावात विलगीकरणात राहायला कोठेही जागा मिळाली नाही. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आलाय याची माहिती गावच्या सरपंचांना पण होती.

गावच्या सरपंचांनी पण त्याला मदत केली नाही. शिवाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे आजूबाजूचे पण त्याला मदत करत नव्हते. त्याला कुटुंबीयांनी पण विलगीकरणात राहावे अशी सूचना केली. पण यावेळी त्याला पण एक आयडिया सुचली.

त्याने त्याचा मुक्काम झाडावर हलवला. झाडावर त्याने मस्तपैकी बाबुंचा बिछाना केला. तो त्याने झाडावर ठेवला आणि त्याने झाडावर अशाप्रकारे ११ दिवसांचा विलगीकरण कालावधी काढला.

देशामध्ये असंख्य कुटुंबे बेघर आहेत आणि काही आहेत त्यांना पण राहायला जागा कमी आहे. त्यामुळे त्यांना कोरोनाकाळात असंख्य अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशा लोकांसाठी सरकारने सरकारी विश्राम गृहाची सोय करायला हवी.

ताज्या बातम्या
६ वर्षांपूर्वी विराट कोहलीने पाहिलेले ‘ते’ स्वप्न आज झाले पूर्ण, सर्व भारतीयांसाठी ठरला आनंदाचा क्षण

विनायक माळीचे व्हिडिओ व्हायरल होण्यामागच खर कारण आलं समोर; जाणून घ्या पुर्ण माहिती..

उद्धव ठाकरे यांनी डॉक्टरांशी साधला संवाद; कोरोना लढ्यात डॉक्टरांचे महत्व केले अधोरेखित

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.