कोरोनाकाळात गरींबासाठी जॅकलिन फर्नांडिस आली धावून; लाखो लोकांपर्यंत पोहोचवते जेवण, पहा फोटो

कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. बऱ्याच राज्य सरकारांनी कडक निर्बंध लावले असून सर्व सरकारी यंत्रणा विषाणूंवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येत आहेत.

कोरोना महामारीच्या काळात बरेचसे बॉलिवूड कलाकार पण मदतीसाठी हात धडपड करताना दिसून येत आहेत. कोणी सोशल मीडियावरून रुग्णांना मदत मिळवून देत आहे तर कोणी प्रत्यक्ष मदत करून गरिबांची सेवा करत आहे.

बॉलिवूड सेलिब्रेटींमध्ये जॅकलिन फर्नांडिस पण मदत करताना दिसून आली आहे. कोरोना काळात लोकांना मदत करण्यासाठी जॅकलिनाने एका संस्थेची स्थापना केली आहे.

जॅकलिनने मदतीसाठी योलो संस्थेची स्थापना केली असून ती लाखो लोकांपर्यंत जेवण पोहोचवण्याचे काम करत आहे. ती तिच्या संस्थेसोबत जेवण देताना पण स्वच्छतेची विशेष काळजी घेत आहे. स्वच्छतेसाठी त्यांची संस्था ग्लोव्ह्ज घालून जेवण देत आहेत.

जॅकलिन फर्नांडिस हिने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती ज्यात म्हटले होते की, लोकांना ऑक्सिजन बेड आणि रेमडेसिवीर प्रमाणे अन्नाची पण गरज भासत आहे. यावेळी अनेकांवर उपासमारीची पण वेळ येत आहे. त्यामुळे जॅकलिन अनेक लोकांची मदत करणार असून तळागाळापर्यंत पोहोचून लोकांची मदत केली जाणार आहे.

अभिनेत्री जॅकलिन फर्नाडिसने ‘रोटी बँक’ नावाच्या संस्थेच्या मदतीने लाखभर लोकांपर्यंत जेवण पोहोचवणार आहे. त्याचप्रमाणे ‘फ्रीलाईन फाउंडेशन’ सोबत करार करून रस्त्यावरच्या १ हजार भटक्या जनावरांसाठी पण मदत करणार आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.