पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा उद्रेक! रुग्णांनी गाठला आजपर्यंतचा सर्वात धक्कादायक आकडा

पिंपरी | पिंपरी- चिंचवड शहरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. सोमवारी तब्बल ५७३ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. आजपर्यंतचा सर्वात धक्कादायक आकडा असल्याचे सांगितले जात आहे.

पिंपरी- चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. पिंपरी- चिंचवडमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा ४,८६१ वर पोहोचला आहे.

सामान्य नागरिकांनपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत कोरोना पोहोचला आहे. शिवाय रुग्ण तपासणीची संख्याही वाढवण्यात आली आहे. यासाठी खासगी लॅबची मदत घेतली जात आहे.

पिंपरी- चिंचवडमध्ये दिवसभरात ५७३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर ३७३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दरम्यान, शहरातील कोरोनाबाधितांची संख्या ४,८६१ झाली आहे. तर १,८६३ जन सध्या उपचार घेत आहेत. तसेच कोरोनामुळे आतापर्यंत ६७ जणांचा मृत्यू झाला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.