मुंबईत कोरोनाचा उद्रेक: १५ जुलैपर्यंत असणार संचारबंदी

मुंबई | कोरोनाने सध्या मुंबईत हाहाकार माजवला आहे. कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईत पुन्हा एकदा संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

आज मध्यरात्रीपासून ते १५ जुलै रात्री १२ वाजेपर्यंत ही संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

दरम्यान, सकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांनाच बाहेर पडण्याची परवानगी देण्यात येणार आहे. अशी माहिती मुंबई पोलीस आयुक्तालयाने पत्रकाद्वारे दिली आहे.

त्याचबरोबर राज्य सरकारने यापूर्वी मिशन बिगीन अंतर्गत बऱ्याच प्रमाणात सवलत दिली होती. पण मागील काही दिवसांपासून राज्यात, तसेच प्रामुख्याने मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आज मध्यरात्रीपासून ते १५ जुलै रात्री १२ वाजेपर्यंत मुंबईत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामधून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.