कोरोनीलने कोरोना बरा होत नाही, पतंजलीने दिशाभूल केल्यास कठोर कारवाई करणार; सरकारचा इशारा

 

मुंबई | देशातील कोरोना संकटाने सध्या थैमान घातले आहे. तसेच देशात कोरोना रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

कोरोनावर अद्याप कोणतीही लस उपलब्ध झालेली नाही. असे असताना बाबा रामदेव यांनी कोरोना विषाणूवर पहिले आयुर्वेदिक औषध बनवल्याचे जाहीर केले होते.

आता याबाबत अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी मोठा खुलासा केला आहे.

योगगुरू रामदेव बाबा यांच्या पतंजलीने बाजारात आणलेल्या कोरोनील नावाच्या औषधाने कोरोना बरा होत नाही.

तसेच या औषधामुळे कोरोना बरा होतो, असा पतंजलीने संभ्रम निर्माण केल्यास किंवा जनतेची दिशा भूल केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा राजेंद्र शिंगणे यांनी दिला आहे.

कोरोनील हे औषधासाठी दिलेले नाव (कोरोना+नील) आणि प्रसार माध्यमातून होणाऱ्या जाहिरातींमुळे जनतेची दिशा भूल होत आहे, असे राजेंद्र शिंगणे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, कोरोनील औषध हे रोगप्रतिकारक शक्तीचे औषध म्हणून वापरले जाऊ शकते. पण याच्यामुळे कोरोना बरा होत नाही याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन शिंगणे यांनी केले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.