कोरोनाने हिरावला गरिबांचा डॉक्टर; पाठोपाठ आईनेही सोडला जीव; जामखेडवर शोककळा

जगात अशी काही लोक असतात जे आपले सर्व काही सोडून समाजाची सेवा करत असतात. संपूर्ण आयुष्य कमी गरजेत जगून निःस्वार्थ सेवा देणारे डॉक्टर प्रवीण पाटील यांच्या जाण्याने पण जामखेड तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

जातेगाव तालुका जामखेड येथे डॉक्टर प्रवीण पाटील रुग्णांवर उपचार करत असत. रुग्णांकडे पैसे असोत किंवा नसोत डॉक्टर साहेब उपचार करत असत. ते रुग्णापर्यंत पोहोचले की त्याच्यावर उपचार होऊन त्याला पण गुण पडायचा.

डॉक्टर पाटील यांनी त्यांच्या कार्याने रुग्णांमध्ये एक चांगली प्रतिमा तयार केली होती. त्यांचे परिसरातील १० ते १२ गावांशी नाते जोडलेले होते. त्यामुळे डॉक्टरांचे सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध तयार झाले होते.

डॉक्टरांचे बालपण पण जामखेड तालुक्यातच गेले. डॉक्टरांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण खर्डा येथे झाले तर त्यांनी वैद्यकीय शिक्षण बीडमधून पूर्ण केले. त्यामुळे त्यांचे पहिल्यापासूनच या भागाशी संबंध जोडले गेले होते.

शहरी भागात रुग्णसेवा करून लाखो रुपये कमवण्याची संधी असताना त्यांनी गावाकडे रुग्णसेवा देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी जामखेड, भूम आणि पाटोदा या तीन तालुक्यांच्या हद्दीवर नागरिकांची सलग १७ वर्ष अव्याहत सेवा केली.

रुग्णसेवा करत असतानाच डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली. त्यांच्या पत्नीने कोरोनावर मात केली. त्यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्या मृत्यूच्या धक्याने त्यांच्या आईचे पण निधन झाले. गरिबांचा डॉक्टर म्हणून प्रवीण पाटील यांची परिसरात ओळख आहे.

ताज्या बातम्या
राखी सावंतचा मोठा खुलासा, डॉनने केली मारहाण आणि दिली पळवून नेण्याची धमकी
तिसरी लाट सुरू, मुलाबाळांना जपा! ‘या’ राज्यात १० दिवसात तब्बल १००० मुलांना कोरोना

चीनकडून काहीच अपेक्षा नाहीत, तुम्ही तरी आॅक्सीजन पाठवा; नेपाळचे भारताला मदतीसाठी साकडे

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.