सरपंच असावा तर असा! सर्वात तरुण सरपंचाच्या गावातून कोरोना गायब, ‘असे’ केले काम…

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्रत्येक गावात कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. असे असताना राज्यात सर्वात तरुण असलेल्या सरपंचाच्या गावात मात्र आता एकही रुग्ण नाही. ऋतुराज देशमुख असे या सरपंचाचे नाव असून हा सरपंच राज्यात सर्वात तरुण सरपंच म्हणून ओळखला जातो.

सर्वांत तरुण सरपंच म्हणून ऋतुराज देशमुख वय २१ यांची घाटणे ता. मोहोळच्या सरपंचपदी निवड झाली आहे. मार्चपर्यंत घाटणेमध्ये एकही कोरोनाबाधित नव्हता. मात्र, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून गावात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली. यामुळे त्यांनी अनेक उपाययोजना सुरू केल्या.

ऋतुराज यांनी सर्व ग्रामस्थांना एकत्र केले आणि “बी पॉझिटिव्ह, आपला गाव ठेवू कोरोना निगेटिव्ह’ ही मोहीम त्यांनी सुरू केली. या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे आज घाटणे गाव कोरोनामुक्त झाले असल्याचे सरपंच ऋतुराज देशमुख यांनी सांगितले.

त्यांनी गावातून जे बाहेर जातात त्या सर्वांची त्यांच्या आवश्‍यकतेनुसार रॅपिड अँटिजेन टेस्ट करून घेतल्या. सर्वांना ४५ वर्षांवरील व्यक्तींना लसीकरण मोहिमेत सहभागी करून घेतले. त्यांना लसीचे महत्त्व सांगितले. गावात घरोघरी जाऊन गावकऱ्यांची तपासणी केली जात असून त्यात त्याची ऑक्‍सिजन लेव्हल, तापमान चेक केले जाते.

ग्रामपंचायतीकडून व्हिटॅमिन गोळ्या, सॅनिटायझर, मास्क, साबण वाटप केले गेले. बाहेरून आलेल्या व्यक्तींना तीन दिवस क्वारंटाइन करून या माध्यमातून कोरोनाची चेन ब्रेक करण्याचा केला प्रयत्न केला. गावात सॅनिटायझर फवारणी अनेकदा केली गेली.

गावात कोरोनाने दोन मृत्यू झाले आहेत. यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले. असे असताना ग्रामपंचायतीने प्रभावी उपाययोजना केल्यानंतर पुन्हा एकदा वाड्या- वस्त्यांवर राहण्यासाठी गेलेले ग्रामस्थ गावात राहण्यासाठी येत आहेत, असे सरपंच ऋतुराज देशमुख यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

कोरोनाची दुसरी लाट हाताळण्यात उद्धव ठाकरे नंबर वन! जाणून घ्या कोणाचा कितवा नंबर

तुमच्या बँक खात्यातून कट होणार १२ रुपये, बदल्यात मिळणार २ लाख, जाणून घ्या…

धक्कादायक! मुंबईत आमदाराच्या पत्नीचा ब्रीजवर चढून आत्महत्येचा प्रयत्न

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.