स्मार्टफोनच्या फ्लॅश लाईटने १० सेकंदात मरणार कोरोना व्हायरस!

 

मुंबई | दक्षिण कोरियातील एका कंपनीने स्मार्टफोनच्या फ्लॅशद्वारे विषाणू मारणारे उपकरण बनवले आहे. याला कंपनीकडून डिजिटल सॅनिटायझर म्हणण्यात येत आहे.

हे उपकरण मोबाईलच्या फ्लॅश लाईटचे रूपांतर अल्ट्रावायलेट लाईट मध्ये करते. विषाणूंना मारण्यासाठी अल्ट्रावायलेट लाईटचा वापर करण्यात येतो.

या उपकरणाला असलेल्या क्लिपच्या मदतीने याला फ्लॅश लाइटवर लावता येते. त्यानंतर फ्लॅश चालू करून दहा सेकंद एकाच जागेवर फोकस करावा लागतो.

हे उपकरण अजून बाजारात उपलब्ध नाही. पण लवकरच हे बाजारात येणार असून याची किंमत दोन हजार रुपयांपेक्षाही कमी असल्याचे कंपनीकडून सांगण्यात येत आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने अल्ट्रावायलेट लाईटमुळे त्वचा रोग आणि डोळे खराब होऊ शकतात असे सांगितले आहे. पण २०७ ते २२२ नॅनोमीटर वेव्हलेंग्थच्या लाईट पासून धोका नसल्याचे सांगितले आहे.

१०० टक्के विषाणू मारण्यासाठी हे उपकरण सक्षम असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. या उपकरणाचा वापर कोणत्याही स्मार्टफोन बरोबर करता येऊ शकतो.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.