कोरोनामुळे होऊ शकतो मधुमेह? आयसीएमआरच्या डॉक्टरांनी दिली ‘ही’ माहिती

कोरोनाचा आजार दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. कोरोनाचा आजार वाढत नाही तोच बाकी आजारांनी पण डोके वर काढायला सुरुवात केली आहे. कोरोना नंतर म्युकोअरमायकोसिस आजार मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे दिसून आले आहे. हा रोग मधुमेहामुळे होत असल्याचे दिसून आले आहे.

मधुमेहामुळे हा आजरा होत असल्याचे आयसीएमआरकडून सांगण्यात आले आहे. आता तर आयसीएमआरने एक नवीनच अहवाल सादर केला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की कोरोना विषाणूमुळे मधुमेहाचा आजार होऊ शकतो.

आरोग्य अंतर्लयाने गुरुवार दिनांक २० मेला बैठक घेतली त्यावेळी आयसीएमआरकडून हे स्पष्ट करण्यात आले आहे. आयसीएमआरचे प्रमुख डॉ. बालराव भार्गव यावेळी उपस्थित होते. कोरोना व्हायरस रुग्णाच्या शरीरातील शुगर वाढवत असल्याचे पण त्यांनी यावेळी म्हटले आहे.

जर एखाद्याला शुगर नसेल आणि त्याला कोरोनाची लागण झाली तर त्याला मधुमेह होण्याचा धोका उदभवू शकतो. कोरोना झाला आणि मधुमेह नसला तरी रक्तातील साखर वाढून रुग्णाला मधुमेह होऊ शकतो असे डॉक्टरांनी यावेळी सांगितले आहे.

दुसरीकडे मधुमेह असणाऱ्यांना म्युकरमायकोसिस होण्याची पण शक्यता उदभवू शकते असे त्यांनी यावेळी सांगितले आहे. कोरोना सोबतच म्युकरमायकोसिस आजार पण वाढत असल्याचे दिसून आले आहे.

केंद्र सरकारने सर्व राज्यांना कोरोनानंतर म्युकरमायकोसिस आजाराला महामारी घोषित करावे असे म्हटले आहे. कोरोना झाल्यावर आणि कोरोनातून बरे झाल्यानंतर पण रुग्णाच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण नियंत्रणात ठेवावे असे सांगण्यात आले आहे.

ताज्या बातम्या
VIDEO: धक्कादायक! मास्क न घातल्यामुळे पोलिसांनी महिलेला खाली पाडून, केसांना धरुन केली मारहाण

अभिनेत्री गौहर खान उतरली पॅलेस्टाईनच्या समर्थनात, इस्त्रायलला धडा शिकवण्यासाठी केले ‘हे’ आवाहन

पावसामुळे रोड खचला आणि संपूर्ण ट्रक खड्ड्यात गेला, पाहा विडिओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.