आता नाकातच कोरोना होणार नष्ट, नाकातून स्प्रेद्वारे घ्यायची लस भारतातही मिळणार

संपूर्ण देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार उडवला आहे. रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे. असे असताना एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. कॅनडातील सॅनोटाईझ या कंपनीची नेझल स्प्रेची चाचणी अमेरिका आणि ब्रिटनमध्ये घेण्यात आली.

हा स्प्रे कोरोनावर परिणामकारक असल्याचे निष्पन्‍न झाले आहे. या कंपनीने भारतातही मंजुरी मिळावी म्हणून प्रयत्न सुरू केले आहेत. लवकरच भारतातील हैदराबाद येथील भारत बायोटेक ही कंपनीही नेझल स्प्रे देशांतर्गत बाजारात उपलब्ध करणार आहे.

यामुळे ही एक दिलासादायक बातमी आहे. यामुळे कोरोना महामारीला लढा द्यायला अजून बळ येणार आहे. कॅनडातील सॅनोटाईझ कंपनीचा स्प्रे नाकात टाकल्याने कोरोना व्हायरस 99.99 टक्क्यांपर्यंत नष्ट होतो. असा दावा करण्यात आला आहे.

आपल्या देशात देखील अशाच प्रकारे कोरोनावर उपचारासाठी अशीच नेझल स्प्रे तयार केली जात आहे. कोरोना प्रतिबंधक लस कोव्हॅक्सिन तयार करणार्‍या भारत बायोटेकनेच ‘कोरोफ्लू’ नावाने हे नाकावाटे घ्यावयाची लस तयार केली आहे.

भारत बायोटेकच्या नाकावाटे द्यावयाच्या स्प्रेची चाचणी नागपूरला होत आहे. या स्प्रेचा केवळ एकच डोस घ्यावा लागणार आहे. या एका डोसमध्ये कोरोनाचा खात्मा होणार आहे. भारत बोयोटेक लवकरच डीसीजीआयकडे प्रस्ताव ठेवेल, असे वैज्ञानिक डॉ. चंद्रशेखर यांनी सांगितले.

यामुळे अजुन आशा पल्लवित झाल्या आहेत. सध्या सिरम, भारत बायोटेककडून कोरोना लसीकरण सुरू आहे. मात्र राज्यात मोठ्या प्रमाणावर लसीचा तुटवडा जाणवत असून अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रे बंद देखील पडली आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.