लग्नाच्या ९ वर्षानंतर घरात पाळणा हालला; पण मुलीच्या जन्मानंतर चार दिवसातच आईवडिलांना कोरोनाने हिरावले

कर्नाटक | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात थैमान घातले आहे. कोरोना रुग्णांचा दिवसेंदिवस मृत्यू होत आहे. कोरोनामुळे हसत्या खेळत्या कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळत आहे. कोरोनामुळे देशात भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे.

कोरोनामुळे कुणी वडिलांना गमावले तर कुणी आईला. काहींनी तर वयात आलेल्या तरूण पोरांना गमावले आहे. काहींच्या तर घरातील सर्व सदस्यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे काळीज पिळवटून जात आहे. कर्नाटकच्या म्हैसूर जिल्ह्यातील डोड्डेनहल्ली गावात एक अशीच दुर्देवी घटना घडली आहे.

एका चिमुकलीच्या आईवडिलांना कोरोनाची लागण झाली होती आणि यामध्येच त्यांचा मृत्यू झाला आहे. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे या कुटूंबात ९ वर्षांनी मुलीचा जन्म झाला होता. मात्र कुटूंबाचा आनंद या क्रूर कोरोनाने हिरावला आहे.

११ मे रोजी नंजुंडे गौडा आणि ममता गौडा यांनी एका गोंडस बाळाला जन्म दिला होता. घरात नवा पाहूणा येणार यासाठी गौडा परिवारामध्ये आनंदाचं वातावरण होतं. याच दरम्यान बाळाच्या वडिलांना कोरोनाची लागण झाली.

नंजुंडे गौडा यांच्यावर बंगळूरूमध्ये उपचार सुरू होते. मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. अखेर त्यांचा ३० एप्रिल रोजी कोरोनाने मृत्यू झाला. वडीलांनी आपल्या लेकीला पाहायच्या आधीच त्यांना कोरोनाने हिरावले आहे.

नंजुंडे यांच्या निधनांनतर कुटूंबाला मोठा धक्का बसला होता. या दु:खातून गौडा कुटूंब स्वत:ला सावरत होतं. त्यानंतर आई ममता यांनी बाळाला जन्म दिला. बाळाच्या जन्मानंतर ममता यांनाही कोरोनाची लागण झाली.

ममता यांच्यावर जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच बाळाच्या जन्माच्या अवघ्या ४ दिवसानंतर  कोरोनाने मृत्यू झाला आहे. यामुळे गौडा कूटूंबावर आनंद साजरा करण्याचं सोडून बाळाच्या आईवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली.

ममता आणि नंजुंडे यांचा विवाह ९ वर्षांपुर्वी झाला होता. लग्नाला खुप दिवस होऊनही त्यांना मुल झाले नव्हते. अनेक दिवस डॉक्टरांकडून उपचार घेतल्यानंतर त्यांनी एका मुलीला जन्म दिला होता. मात्र मुलीच्या जन्माच्या स्वागताच्या वेळेसच आईवडिलांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

महत्वाच्या बातम्या-
खतरों के खिलाडी ११ मधील स्पर्धकांनी परदेशातही दाखवला आपला जलवा; पहा फोटो
इम्रान हाश्मीसोबत बॉलीवूडमध्ये डेब्यू केल्यानंतर देखील अभिनेत्रीचे करिअर झाले फ्लॉप; पहा कोण आहे ती अभिनेत्री
कोरोनाने हिरावला गरिबांचा डॉक्टर; पाठोपाठ आईनेही सोडला जीव; जामखेडवर शोककळा
विनायक माळीचे व्हिडिओ व्हायरल होण्यामागच खर कारण आलं समोर; जाणून घ्या पुर्ण माहिती..

 

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.