आता कोरोनामुळे मृत्यु झालेल्या रुग्णांच्या मृत्यु दाखल्यावरही मोदींचा फोटो?; वाचा काय आहे सत्य

देशभरात कोरोनाच्या संकटाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक लोकांचा मृत्युही होत आहे.

सध्या देशभरात अनेक गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यातलाच एक मॅसेज म्हणजे कोरोनामुळे निधन झालेल्या रुग्णांच्या मृत्यु प्रमाणपत्रावरही पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो छापला जात असून, भाजपा कुठेही आपल्या पक्षाच्या प्रचाराची संधी सोडत नाहीये.
त्या फोटोमध्ये एका ठिकाणी क्युआर कोड दिसत आहे, तर त्याच्या खाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो दिसत आहे. #Mautkasaudagar असा हॅशटॅग वापरुन हा फोटो शेअर केला जात आहे.

एका फेसबुक युजरने हा फोटो शेअर करत म्हटले आहे की, आता फक्त हेच बघायचे राहिले होते का? नरेंद्र मोदींनी मृत्युच्या दाखल्यावरही स्वत:चा फोटो लावला आहे. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. आता या फोटो मागचे सत्य समोर आले आहे.

इंडिया टुडेची अँटी फेक न्युज वॉर रुम यांनी याबाबत तपास केला आहे. तेव्हा सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये मृत्यु दाखला नाही, तर लसीकरणाचे प्रमाणपत्र आहे. त्यामुळे मृत्यु दाखल्यावर मोदींचा फोटो लागत असल्याचा तो मॅसेज एक फेक न्युज असल्याचे स्पष्ट झाले.

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये झालेल्या निवडणूकीत लसीकरण प्रमाणपत्रावर लावलेल्या मोदींच्या फोटोवर तृणमुल काँग्रेसने आक्षेप घेतला होता. यामुळे आचारसंहिताचे उल्लंघन होत असल्याचे तृणमुल काँग्रेसने म्हटले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाने आरोग्य मंत्रालयाला पत्र लिहित लसीकरणाचे प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो लावू नये, असे म्हटले होते.

महत्वाच्या बातम्या-

१८ ते ४५ वयोगटातील लोकांच्या लसीकरणासाठी एक महिना पाहावी लागणार वाट; आरोग्यमंत्र्यांचे वक्तव्य
मास्कविना पकडल्यामुळे पोलिसाने कानाखाली मारली, तर तरुणानेही मारले पोलिसाला; घटनेचा व्हिडिओ व्हायरल
लोकांना घरी राहायला सांगता मग तुम्ही का निवडणूका घेता; भाजपच्या नेत्याने मोदींना सुनावले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.