देशातील ६० टक्के कोरोना रुग्णांचा मृत्यु कोरोनाने नाही तर ‘या’ कारणामुळे झाला; धक्कादायक माहिती उघड

देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने धूमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे रुग्णांच्या मृत्युची संख्या पण वाढत चालली आहे. अशातच संशोधकांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचाही अंदाज व्यक्त केला आहे.

आतापर्यंक देशातील तीन लाखपेक्षा जास्त नागरीकांचा मृत्यु झाला आहे. आता रुग्णांच्या मृत्युबाबत मोठी माहिती समोर आली असून या माहितीमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. लोकांच्या मृत्यु मागचे कारण प्रमुख कारण आता जर्नल इंफेक्शन आणि ड्रग रेसिस्टंसमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

कोरोनाच्या काळात रुग्णांवर अँटीबायोटिक्सचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. त्यामुळे रुग्णांच्या शरीरात सुपरबग तयार होत आहे. परिणामी बॅक्टेरियल आणि फंगल इंफेक्शन वेगाने वाढत आहे, अशी माहिती अहवालातून समोर आली आहे.

कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी अँटीबोयाटिक्सचा उपयोग केला जातो. सुक्ष्मजीवांना निष्रभ बनवण्यासाठी याचा उपयोग केला जातो. पण अँटीबायोटिक्सचा जास्त वापर केल्यास सुक्ष्मजीव त्यांच्याविरोधात प्रतिरोधक क्षमता विकसित करतात. त्यामुळे अँटीबायोटिक्सचा परिणाम होत नाही, असे अहवालात म्हटले आहे.

तसेच कोरोना रुग्णांमध्ये अँटीबायोटिक्सच्या अतीवापरामुळे संक्रमण झाले आहे. त्यामुळे देशातील ६० टक्के लोकांचा मृत्यु झाला आहे. देशातील ६० टक्के मृत्युंना केवळ बॅक्टेरीया आणि फंगसमुळे तयार झालेला सुपरबग कारणीभुत आहे.

सुपरबगची शिकार न झालेल्या केवळ ११ टक्के रुग्णांचाच मृत्यु झाला आहे. यातील काही रुग्ण मधूमेह आणि रक्तदाबाचा सामना करत होते, अशीही माहिती या अहवालातुन समोर आली आहे

महत्वाच्या बातम्या-

बॉलीवूडमध्ये अपयश, घरच्यांनी सोडले, राज किरण यांना करावे लागले मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल..
सुशांतच्या पुण्यतिथीच्या आधी रियाने शेअर केला पॉवरफुल मेसेज, चाहते म्हणाले, आम्ही तुझ्यासोबत..
छातीत दुखत असतानाही लक्ष्याची आई हसत होती, वाचा लक्ष्याच्या आयुष्यातला न ऐकलेला किस्सा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.