कोरोनामुळे मृत्यु झालेल्या बॉडीला स्पर्श केल्याने आपल्याला कोरोना होतो का? डॉक्टर म्हणतात…

देशभरात कोरोनाच्या संकटाने थैमान घातले आहे. वाढत्या रुग्णसंख्य़ेमुळे लाखो रुग्णांवर उपचार सुरु आहे. तर कोरोनामुळे अनेक रुग्णांचा मृत्युही होत आहे. अशा परिस्थितीत अनेक धक्कादायक घडताना दिसून येत आहे.

कोरोनामुळे मृत्यु झाल्याने अनेक नातेवाईकही कोरोनाच्या भितीने मृतदेहावर अंत्यसंस्कार करत नाहीये. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांनाच कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार करावे लागत आहे. पण कोरोनामुळे मृत्यु झाल्याने मृतदेहाला स्पर्श केल्याने कोरोनाची लागण होत आहे का? असे अनेक प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे.

आता इंडिया टुडेच्या कोविड हेल्पलाईनवर एम्समध्ये कार्यरत असलेले डॉ. प्रवीण गुप्ता यांनी कोरोना संबंधित अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहे. यावेळी कोरोनामुळे मृत्यु झालेल्या व्यक्तीच्या मृतदेहाला हात लावला तर कोरोना संसर्ग होतो का? या प्रश्नाचेही उत्तर त्यांनी दिले आहे.

जेव्हा एखाद्या कोरोना रुग्णाचा मृत्यु होता, तेव्हा त्याचे मृतदेह चांगल्याप्रकारे रॅप केले जाते. त्यामुळे मृतदेहातून कोरोनाचा संसर्ग पसरण्याचा धोका कमी होतो. तसेच कोरोना हा हवेतून पसरतो आणि मृतदेह ना श्वास घेते, ना शिंकते, ना खोकते, त्यामुळे त्यातुन कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका नसतो.

तसेच जर तुम्ही रॅप केलेल्या मृतदेहाला स्पर्श केला तर हात चांगले धुतले पाहिजे. तसेच सर्व कोरोना नियमांचे पालन करुनच मृतदेहावर अंत्यसंस्कार केले पाहिजे, असे डॉ. गुप्ता यांनी म्हटले आहे.

दरम्यान, कोरोनाच्या संकटात अनेक धक्कादायक वृत्त समोर येत आहे. घरातील एखाद्या सदस्याचा कोरोनामुळे मृत्यु झाल्यास मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याऐवजी सदस्य कोरोनाच्या भितीने मृतदेह घेण्यास नकार देत आहे. त्यामुळे अनोळखी आणि प्रशासनाचे कर्मचारीच कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार करत आहे.

महत्वाच्या बातम्या- 

सलमान खानचा मदतीचा सपाट सुरूच, आता २५ हजार मजुरांच्या बँक खात्यात दीड हजार रुपये पाठवणार
“संसदेसाठी, पुतळ्यांसाठी २० हजार कोटी, मग लसीकरणाला ३० हजार कोटी का नाहीत?”
उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाची बिकट स्थिती, यमुनेत तरंगताहेत मृतदेह; यंत्रणाही हादरली

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.