कोरोना झालेला असतानाही तो लग्नाच्या वरातीत नाचला अन् साऱ्या गावाला कोरोना देऊन आला

देशात कोरोनामुळे प्रशासनाने नियम व अटी लागू केल्या आहेत. मात्र अनेकजण याचे पालन करत नाहीत. यामुळे कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. अशीच एक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. एका व्यक्तीमुळे संपूर्ण गाव कोरोनाग्रस्त झाले आहे.

मध्य प्रदेशमधील टीकमगड जिल्ह्यामध्ये अरुण मिश्रा नावाचा २४ वर्षीय तरुण गावात झालेल्या एका लग्नामध्ये सहभागी झाला. तो वरातीमध्ये नाचाला, पंगतीला त्याने जेवायला वाढले, मात्र हे करताना त्याने जवळजवळ संपूर्ण गावाला कोरोनाबाधित केले आहे.

धक्कादायक प्रकार म्हणजे, या तरुणाला कोरोनाची लागण झाल्याचे त्याला माहीत होते तरी तो लग्नात गेल्याचे समोर आले आहे. यामुळे आता संपूर्ण गाव सील करण्यात आले आहे.

अरुण मिश्राच्या कोरोना चाचणीचा निकाल पॉझिटिव्ह आला होता. मात्र त्यानंतरही तो क्वारंटाइन झाला नाही. त्यानंतर अरुण गावातील एका लग्न समारंभाला उपस्थित राहिला होता. तो लग्नातील जवळजवळ प्रत्येक लहान मोठ्या कार्यक्रमामध्ये गर्दीत मिसळून फिरत होता. त्याने सर्वांबर फोटो देखील काढले.

यानंतर गावातील लोक आजारी पडू लागले. आणि हे सर्व त्याचा जवळचे लोक होते, एकाचवेळी त्याच्या संपर्कातील ४० लोकांना कोरोना झाला. हे समजताच चौकशी करण्यात आली. यामुळे आता संपूर्ण गाव सील करण्यात आले आहे.

यामुळे नियमांचे पालन केले नाही तर कशा पद्धतीने कोरोनाचा प्रसार होतोय हे पुन्हा एकदा समोर आले आहे. आता या गावातून आता किंवा बाहेर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

मुंबई कशी बदलली? तेव्हाच्या आणि आताच्या मुंबईत काय फरक आहे? पहा शरद पवार काय म्हणतात..

रेमडीसीवीरसाठी खूप लोकांनी मागणी केली पण कोरोनील हवे ही मागणी कुणीच केली नाही

शिव नादर: खाजगी नोकरी सोडून मित्रांच्या मदतीने सुरू केली कंपनी, आज आहेत १.७० लाख कोटींचे मालक

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.