कोरोना संकट गंभीर, आयपीएल पुढे ढकला; तो पैसा ऑक्सिजन टँकसाठी वापरा – शोएब अख्तर

सध्या देशात मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्णसंख्या वाढत असून आरोग्य व्यवस्था कोलमडू लागली आहे. रुग्णांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर सुद्धा उपलब्ध नाहीत, यामुळे अनेक रुग्णांचे मृत्यू होत आहेत. अशातच सध्या आयपीएलची स्पर्धा सुरू आहे.

यामुळे आता कोरोना महामारीचे वाढते संकट लक्षात घेता आयपीएल आणि पाकिस्तान प्रमिअर लीग स्पर्धा पुढे ढकलण्याचा सल्ला पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने दिला आहे. सध्या आयपीएल भारतात सुरू आहे.

आयपीएलचे आतापर्यंत एकूण २० सामने देखील झाले आहेत. पण देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन आयोजकांनी स्पर्धा पुढे ढकलण्याबाबत विचार करायला हवा, असे मत शोएब अख्तरने व्यक्त केले आहे.

या काळात नागरिकांचे जीव महत्वाचे आहेत. आयपीएलवर मोठ्या प्रमाणावर होतो, या स्पर्धांवर खर्च होणारा पैसा कोरोना संकटासाठी वापरण्यात आला तर मोठी मदत होईल आणि परिस्थिती बदलता येईल, असे मत शोएब अख्तरने व्यक्त केले.

तसेच पाकिस्तान प्रिमिअर लीग फेब्रुवारी महिन्यात सुरू झाली होती. पण संघातील खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यामुळे स्पर्धा काही कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही स्पर्धा १ जूनपासून पाकिस्तान प्रमिअर लीग पुन्हा सुरू होणार आहे. यामुळे ही रद्द करावी अशी मागणी त्याने केली.

आयपीएलवर खर्च होणारा पैसा ऑक्सिजन टँक खरेदी करण्यासाठी वापरता येईल. त्यामुळे अनेकांचे जीव वाचतील. सध्या आपल्याला मनोरंजनाची गरज नाहीय. सध्या आपल्याला भारतीय आणि पाकिस्तानी नागरिकांचे जीव वाचवणे जास्त महत्वाचे आहे.

तसेच तो म्हणाला, रोज मृत्यूंचे आकडे वाढताहेत म्हणून मी हे कठोर विधान करतोय, असे विधान शोएब अख्तरने केले आहे. आता राहिलेली स्पर्धा होणार का.? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

क्रूरतेचा कळस! गर्भवती वाघीणीला जिवंत जाळले; वाघीनीच्या पोटात होती चार पिल्ले

५०० रूपयाचे रेमडेसिवीर ७० हजारांना विकणाऱ्या मेडीकल चालकांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या

मोठ्या मनाचा आमदार! मुलाचे लग्न साधेपणाने करत वाचलेल्या पैशातून करणार लोकांचे लसीकरण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.