कोरोना रोखण्यासाठी देशात गृह मंत्रालयाने केले कडक निर्बंध लागू; केंद्रीय गृहमंत्रालयाचे आदेश

कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र सरकारने नवीन नियमावली जाहीर केली आहे. केंद्र सरकारने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये ३० जूनपर्यंत कडक लॉकडाऊन केले आहे.

ज्या ठिकाणी कोरोना रुग्णसंख्या जास्त असेल तर स्थानिक पातळीवर निर्णय घेतले जाणार आहेत. कोरोना रोखण्यासाठी सक्तीने उपाययोजना लागू करण्यात याव्यात असे केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी सांगितले आहे.

भल्ला यांनी आदेशात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत घट होत आहे. तरी कोरोना रुग्णसंख्येवर उपचार घेणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे कोरोना रोखण्यासाठी कडक पाऊले उचलणे गरजेचे आहे.

राज्य आणि केंद्र शासित प्रदेशच्या मुख्य सचिवांनी स्थानिक परिस्थिती, अत्यावश्यक सेवा याचा आढावा घेऊन टप्याटप्याने लावलेले लावलेले निर्बंधात सूट देण्याबाबत विचार करू शकतात. केंद्र सरकारने २९ एप्रिलला दिलेल्या मार्गदर्शक सूचना ३० जूनपर्यंत लागू राहणार आहेत.

गृहमंत्रालयाने सांगितल्या नुसार ऑक्सिजन बेड्स, व्हेंटिलेटर आणि आयसीयू बेड्स यांची पर्यायी व्यवस्था सुनिश्चित करावी. आवश्यकतेप्रमाणे तात्पुरते कोविड रुग्णालय उभारण्यात यावेत.

भारतात कोरोना एकूण रुग्णसंख्या २ कोटी ७३ लाख ६९ हजार ०९३ इतकी आहे. त्यातील ३ लाख १५ हजार २३५ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोना रुग्णसंख्या दर कमी होत चालला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने ३० जूनपर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर केले आहे.

ताज्या बातम्या
मराठा समाजाने तुम्हाला ठेका दिलेला नाही; निलेश राणेंची संभाजीराजेंवर गंभीर टीका

ऑस्ट्रेलियातील नोकरी सोडून सुरू केला महाराष्ट्रीयन जेवणाचा व्यवसाय, आज आहेत १४ रेस्टॉरंट्स

काय सांगता! २६ महिन्यांचा मुलगा विराट कोहली सारखा खेळतोय क्रिकेट, पाहा विडिओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.