कोरोना नाहीच म्हणत कोरोनाग्रस्त मित्राला बोलवून केली पार्टी, आठवड्यातच झाला मृत्यू

कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे नियम लागू करण्यात आले आहेत. नियम लागू केले असले तरी अनेकजण नियमांचे उल्लंघन करत आहेत. यामुळे अनेकांचे जीव धोक्यात आले आहेत.

नॉर्वेचा हंस ख्रिश्चन गार्डनर नावाचा एक माणूस कोरोनाविषयी सतत असत्या खोट्या आणि दिशाभूल करणार्‍या बातम्यांमुळे चर्चेत होता. कोरोना नाहीच असे तर सतत इतरांना सांगत होता. कोरोना असताना त्याने काही दिवसांपूर्वी आपल्या घरी दोन पार्टी आयोजित केल्या होत्या.

विशेष म्हणजे या पार्टीत कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या लोकांना बोलविण्यात आले. यामुळे कोरोना संसर्ग बर्‍याच लोकांमध्ये पसरला. यामुळे आता या पार्टीमध्ये उपस्थित असलेल्या सर्वांची कोरोना चाचणी केली जाणार आहे.

गार्डनरने कोरोना विषाणूची चुकीची माहिती सोशल मीडियावर पसरवली आहे. अमेरिकेच्या निवडणुकीविषयी दिशाभूल करणार्‍या बातम्यांचा प्रसार केला. त्यांने दोन दिवस पार्टीचे आयोजन केले आणि कोरोनाचा गंभीर संसर्ग झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

अनेक बेजबाबदार लोकांमुळे कोरोना वाढत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. यामुळे इतरांचे देखील जीव धोक्यात येत आहेत. मास्क न घालणे, कोरोना नाहीच असे इतरांना सांगणे यामुळेच परिस्थिती हाताबाहेर चालली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.