लहान मुलांना जपा! एकट्या मार्चमध्ये ५५ हजार मुलांना कोरोना; राज्यात कोरोनाचा हाहाकार

राज्यात पुन्हा एकदा कोरोना वेगाने पसरताना दिसून येत आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे हजारो रुग्ण सामोर येत आहे, असे असताना मार्च महिन्यातील कोरोना संक्रमित झालेल्या मुलांची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत मोठ्याप्रमाणात लग्न आणि किशोरवयीन मुलांना कोरोना होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार मार्च महिन्यात १० वर्षापर्यंतच्या १५ हजार ५०० मुलांना कोरोनाची लागण झाली आहे, तर ११ ते २० वर्षांच्या मुलांचा आकडा जोडला तर हा आकडा ५५ हजार मुलांपेक्षा जास्त आहे.

इमारतीच्या गार्डनमध्ये किंवा सोसायटीत लहानमुले एकत्र खेळताना दिसून येतात, लहान मुलं मास्क लावत नसल्यामुळे त्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव होत आहे. पण यात चांगलीबाब म्हणजे लहान असणाऱ्या मुलांमधील कोरोना लवकर बरा होत आहे.

लहान मुलांची रोगप्रतिकारकशक्ती सक्षम असते, त्यांना कोरोना झाला तरी हा सौम्य स्वरूपाचा असतो. पण आजार होऊ नये यासाठी काळजी घेतली पाहिजे, असे प्रसिद्ध डॉक्टर त्यात्याराव लहाने यांनी म्हटले आहे.

दरम्यान, आज नव्याने तब्बल ३९ हजार ५४४ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे वाढती रुग्णसंख्या बघता राज्यात मर्यादित लॉकडाऊन करण्याची शक्यता आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.