‘हवेतूनही पसरू शकतो कोरोना; जाणून घ्या कसा कराल बचाव’

 

 

मुंबई | सध्या जगभरात कोरोनाच्या संकटाने थैमान घातले आहे. यामुळे अनेक शास्त्रज्ञांकडून या कोरोना विषाणूबाबत विविध संशोधन केले जात आहे.

 

आता पर्यंत कोरोना विषाणूचा संसर्ग एखाद्या संक्रमित व्यक्तीशी संपर्कात आल्याने किंवा शिंकल्यानंतर, खोकल्यावर तोंडातून आलेला थेंब ज्या पृष्ठभागावर पडतो त्याच्याशी संपर्क आल्याने कोरोनाचा संसर्ग होतो.

 

ही सर्व कारणे आपल्याला माहित आहे, तसेच ही माहिती जागतिक आरोग्य संघटनेनेही दिली आहे. पण आता एक संशोधन करण्यात आले असून शास्त्रज्ञांनी कोरोना हा हवेच्या मार्फत पसरू शकतो, असा दावा केला आहे.

 

चीन, अमेरिका, इटली, ब्राझील या देशातल्या कोरोनाबाधितांचा अभ्यास करून शास्त्रज्ञांनी हा दावा केला आहे. या संदर्भात जगातल्या ३२ देशांच्या २३९ शास्त्रज्ञांनी या संदर्भात जागतिक आरोग्य संघटनेला पत्र लिहले आहे.

 

तसेच शास्त्रज्ञांनी हवेमार्फत होणारा कोरोनाचा संसर्ग कसा टाळाल याबाबत माहिती दिली आहे.

 

सोशल  डिस्टन्सिंग पाळणे खूप गरजेचे आहे असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. कारण संक्रमित व्यक्ती जितकी तुमच्या जवळ तितका कोरोनाचा धोका जास्त असतो.

 

तसेच हात स्वच्छ धुणे गरजेचे आहे. तसेच घरातील हवाही खेळती असणे गरजेचे आहे.

 

मास्क वापरण्यावर अधिक भर देणे खूप गरजेचे आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना N95 वापरण्याबाबत सल्ला दिला आहे. ज्यामध्ये  अ‍ॅरोसोल फिल्टर करण्याची क्षमता असते.

 

सर्व सामान्य नागरिकांनी साधा कापडी मास्क वापरणे गरजेचे आहे. तसेच घरात असतानाही मास्क वापरावा.

 

एखाद्या खोलीतही एअर फिल्टर आणि अल्ट्राव्हायोलेट लाईट्स असण्याची गरज आहे. जे कोरोना व्हायसरचा नाश करतील, असेही शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.