मोठी बातमी! आता प्राण्यांमध्येही कोरोनाचा शिरकाव, ८ सिहांना कोरोनाची लागण

देशात कोरोनाची दुसरी लाट आली असून यामध्ये अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. सर्वसामान्य लोकांपासून, राजकीय नेते, कलाकार, खेळाडू यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. असे असताना आता प्राण्यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

हैद्राबादमधल्या नेहरु प्राणी संग्रहालयातल्या ८ सिंहांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. यामुळे आता प्राण्यांना देखील कोरोना होतो हे सिद्ध झाले आहे. यामुळे आता त्यांची काळजी घेतली जात आहे.

याबाबत प्राणी संग्रहालयातल्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. या सिंहांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. ती पॉझिटिव्ह आली आहे. आता या सिंहांना विलगीकरणात ठेवण्यात आले असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.

यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अन्य देशात प्राण्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत होते. मात्र, भारतात प्राण्यांना कोरोनाची लागण होण्याची ही पहिलीच घटना आहे. या प्राणी संग्रहालयातल्या १२ पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली होती.

यामुळे आता बाहेरील लोकांना आत जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. सर्व नियमांचे आता पालन करण्यात येत आहे. द हिंदूने याविषयी दिलेल्या वृत्तानुसार, या सिंहांना कोरडा खोकला, नाक वाहणे, खाण्यापिण्याच्या तक्रारी अशी लक्षणे दिसून आल्यानंतर त्यांची चाचणी करण्यात आली.

सिंहांना ही लक्षणे जाणवत असल्याचे प्राणी संग्रहालयाच्या केअरटेकर्सच्या लक्षात आले. यामुळे त्यांची चाचणी करण्यात आली. यामध्ये ही धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे आता काळजी घेतली जात आहे.

ताज्या बातम्या

लक्षणे जाणवल्यास लगेच सीटी स्कॅन करू नका, ऑक्सिजन ९५च्या खाली असेल तरच करा-तात्याराव लहाने

थरारक चकमकीत पोलीसांनी चोरासह पकडले ४४० हिरे; किंमत ऐकून घालाल तोंडात बोटे

शिक्षकांनी हाती घेतला समाजसेवेचा वसा; कोरोना रुग्णांसाठी उभारलं ७० ऑक्सिजन बेडचं कोविड सेंटर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.