कोरोना आणि हार्ट अटॅक काय आहे सबंध? कस करायचं संरक्षण? जाणून घ्या तज्ञांचा सल्ला

वाढत्या कोरोनाच्या प्रदुर्भावात अनेक गोष्टी समोर आलेल्या पाहायला मिळतात. त्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट समोर आली ती म्हणजे कोरोना रुग्ण हार्ट अटॅकचा शिकार झालेला पाहायला मिळतोय. त्यामुळे त्यातील काही रुग्णांचा मृत्यू झालेला पाहायला मिळतो.

प्रसिद्ध टीव्ही पत्रकार रोहित सरदाना आणि सगळ्याचे चाहते संगीतवादक पंडित देबू चौधरी हे दोघे कोरोना संक्रमित झाले होते, त्यांच्या उपचारादरम्यान त्यांना हार्ट अटॅक आला आणि त्यांचा मृत्यू झाला. अश्या अनेक घटना पाहायला मिळतात. यावरून असे निदर्शनात येते की, कोरोना आणि हार्ट अटॅक यामध्ये काही संबध आहे का नाही? याविषयी तज्ञाचा शोध चालू आहे.

इंटरव्हेंशनल कार्डिओवस्कुलर सर्जन आणि मेट्रो हॉस्पिटल्‍स एंड हार्ट इंस्टीट्यूट्स कार्डिएक कॅथ लॅब के निदेशक डॉ. समीर गुप्ता सांगतात की, पाहिलं हे समजून घेण गरजेच आहे की हृदयाच्या रक्तवाहिनी मध्ये रक्त गोठते (ब्‍लड क्‍लॉट) त्यामुळे हृदय विकाराचा झटका येतो. आणि काही वेळा हृदयाकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्या  जास्त गतीने (रिदम) त्याचे काम करू लागतात ज्यालाच कार्डियक अरेस्‍ट असे म्हणतात. अशावेळी रुग्णाला वाचवायला खूप कमी वेळ मिळतो.

कोविड १९ या दोन्ही गोष्टींशी सबंध आहे. कोरोनाच्या संक्रमणामुळे हार्टवर स्ट्रेस पडतो तसेच हृदयाला सूज येते आणि हृदयाचे रिदम खराब होऊ शकते. त्यामुळे कोरोना संक्रमणामुळे काहीच लोकांमध्ये हृदयविकाराचा त्रास उद्भवतो.

डॉ. समीर सांगतात की मागच्या काही दिवसांच्या अहवालानुसार असे लक्षात आले आहे की, कोरोनाचा केवळ फुफुसंवारच परिणाम होत नाही तर बाकी शरीरावरही परिणाम होतो. ज्यामध्ये हृदयाचा देखील समावेश आहे. तसेच कोरोना रूग्णांमध्ये या संक्रमणामुळे ब्‍लड क्‍लॉट तयार होते जे की या रुग्णासाठी धोक्याची घंटा आहे आणि ज्यामुळे हार्ट अटॅक येऊ शकतो.

हार्टच्या सुरक्षतेसाठी काय कराल? 

डॉ. समीर गुप्ता सांगतात की, कोरोना संक्रमाना दरम्यान हृदयाची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. यासाठी नियमित व्ययाम करणे गरजेचे आहे. तसेच या दरम्यान जेवणाकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. आवश्यक असा सकस आहार घ्या आणि हृदय हेल्दी ठेवा.

हार्ट संबंधी काही प्रॉब्लेम असतील तर काय करायचे?

डॉ. समीर समजावून सांगते की जर ब्लड प्रेशर, हायपरटेंशन, स्मोकिंग, हाई कोलस्ट्रॉल, मोटापा, अत्यधिक लिपिड पातळी संबंधी रोग मुख्य कारणे आहेत. कोविड इन्फेक्शन्सच्या कालावधीत या सर्व गोष्टींवर विशेष लक्ष दिले पाहिजे. श्वास घ्यायला त्रास होत असेल, चेस्ट पेन, पायांना सूज, घाम अशी लक्षणे दिसल्यास त्वरित हॉस्पिटलमध्ये जा किंवा डॉक्टरांशी संपर्क साधा. आणि त्वरित डॉ. च्या सल्ल्याने  ब्लड टेस्ट, एक्सरे, ईसीजी किंवा तपासणी करून उपचार करा.

हे ही वाचा-

लॉकडाऊन मध्ये पुणेकरांना घरपोच अस्सल हापूस पोहचवणारा ऍग्रीवाला

दोन वर्षांपासून BCCI ने थकवले पैसे; कोरोनाग्रस्त भावाच्या उपचारासाठी क्रिकेटपटू झालाय हतबल

अनुष्का शेट्टी प्रभाससोबत नाही तर या उद्योगपतीसोबत करणार लग्न; नाव वाचून धक्का बसेल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.