कोरोना झालाय.? घाबरू नका, १०५ वर्षीय आजोबाही झालेत बरे, फक्त या गोष्टींकडे लक्ष द्या

लातूर । राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तरुणांपासून ते वयस्कर व्यक्तींना देखील कोरोनाची लागण होत आहे. मात्र अनेकदा केवळ भीती घेऊन अनेकांचे जीव गेल्याचे समोर आले आहे.

मात्र भीती न घेतल्यास जास्त वय असलेले सुध्दा बरे होतात. लातूरमधील जिगरबाज १०५ वर्षीय आजोबांनी नुकतीच कोरोनावर मात केली आहे. लोदगा येथील धोंडीराम अंधारे यांनी ७ दिवसात कोरोनावर मात केली आहे.

शरीरासोबत मनाने कणखर असलेले अंधारे यांना गेल्या आठवड्यात कोरोना झाला. खोकला, ताप आल्याने घरच्यांनी त्यांची कोरोना टेस्ट केली. यामध्ये त्यांना कोरोना झाला असल्याचे स्पष्ट झाले.

त्यांना एका खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. त्यांनी उपचाराचा प्रतिसाद देत मला काहीच होणार नाही असे रोज डॉक्टरांना सांगून कोरोनावर मात केली. दिलेली औषधे वेळेवर खाणे, खचून न जाता त्यांनी कोरोनावर मात केली. अशी अनेक उदाहरणे देखील आहेत.

उपचार घेत असताना ते आरोग्य कर्मचाऱ्यांशी देखील ते साकारात्मक चर्चा करत होते. ते कशालाही घाबरले नाहीत. यामुळे त्यांनी कोरोनाची लढाई जिंकली. शारीरिक कष्ट, मनोबल, हे जर साकारात्मक असेल तर कोणीही यावर मात करेल, असेही औसा येथील डॉ. अंगद जाधव यांनी सांगितले.

केवळ कोरोना झाला म्हणून अनेकांनी भीतीमुळे आत्महत्या देखील केली. नुसते कोरोना झाला म्हटले की हातपाय गळून जातात. असे असताना हे १०५ वर्षाचे आजोबा आपल्यापुढे प्रेरणादायी आहेत. योग्य काळजी आणि उपचार केल्यास कोरोना नाहीसा होतोय.

ताज्या बातम्या

कोरोनाने आई देवाघरी गेली, दु:ख सहन न झाल्याने लेकीने मारली थेट इमारतीवरून उडी; पाहा व्हिडिओ

बाॅलीवूड अभिनेता अवघ्या चारच दिवसांत झाला कोरोनामुक्त! त्यामागील कारणही सांगीतले

ऑक्सिजन तुडवड्यावर मार्ग काढण्यासाठी शरद पवार मैदानात; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.