बाबा रामदेव यांच्या ‘कोरोनील’ला मिळाली विक्रीची परवानगी

 

देहरादून | पतंजलीच्या कोरोनील या औषधावर लावलेला प्रतिबंध आता मागे घेण्यात आला आहे. बाबा रामदेव यांनी आज पत्रकारांशी बोलताना आयुष मंत्रालयाने कोरोनिलच्या विक्रीला परवानगी दिल्याचे सांगितले.

पतंजलीला हे औषध विकण्याची परवानगी जरी मिळाली असली तरी कोरोना बरे करणारे औषध असल्याच्या नावाने त्यांना हे औषध विकता येणार नसल्याची माहिती आयुष मंत्रालयाने दिले आहे.

या औषधाला प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या औषधाच्या रूपात विक्री करण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे आजपासूनच हे औषध देशभरात विकले जाऊ शकते.

या आयुर्वेदिक औषधाला पतंजलीने २३ जूनलाच लॉन्च केले होते. पण नंतर सरकार कडून याच्यावर बंदी घालण्यात आल्यामुळे याची विक्री करण्यात अडथळा आला होता.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.