Homeताज्या बातम्याबनारसच्या घाटावर बजरंग दल-विश्व हिंदू परिषदेने लावले वादग्रस्त पोस्टर्स; लिहीले, 'अशा' लोकांना...

बनारसच्या घाटावर बजरंग दल-विश्व हिंदू परिषदेने लावले वादग्रस्त पोस्टर्स; लिहीले, ‘अशा’ लोकांना प्रवेश नाही

2021 च्या सुरुवातीच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काशी विश्वनाथ कॉरिडॉर या ड्रीम प्रोजेक्ट अंतर्गत वाराणसीची सावली सुधारण्याचे काम वेगाने सुरू होते. कॉरिडॉरच्या बांधकामाच्या मध्यभागी काशी विश्वनाथ मंदिराला लागून असलेल्या ज्ञानवापी मशिदीच्या मालकीची जमीन येत होती. पाहायला गेल तर अडथळा फार मोठा होता, पण गंगा-जमुनी तहजीबच्या या नगरीने हा अडथळा अगदी सहज दूर केला.

हिंदू-मुस्लीम दोन्ही पक्षांनी बसून चर्चा केली आणि परस्पर समन्वयाने मशिदीच्या प्रतिनिधींनी ही 17शे चौरस फूट जागा कॉरिडॉरसाठी दिली. त्या बदल्यात मशिदीच्या बाजूने शहरातील अन्य भागातील जमीन देण्यात आली. या गोष्टीवरून सर्वत्र दोन्ही समाजातील लोकांचे कौतुक केले गेले होते.

गंगा-जमुनी तहजीबची अशी उदाहरणे यापूर्वीही बनारस शहरात पाहायला मिळाली आहेत. पण आज या शहरातून एक अशी बातमी समोर आली आहे, जी आपल्या तहजीबचे अजिबात वर्णन करत नाही. वाराणसीतील गंगा घाट आणि धार्मिक स्थळांवर ‘बिगर हिंदूंना प्रवेश निषिद्ध’ असे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. हे पोस्टर्स प्रशासनाने लावले नसून विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने लावले आहेत.

रिपोर्टनुसार, या पोस्टर्सवर लिहिले आहे की, गंगा मातेचे घाट, मंदिरे आणि काशी हे सनातन धर्म, भारतीय संस्कृती, आदर आणि श्रद्धा यांचे प्रतीक आहेत. ज्यांची सनातन धर्मावर श्रद्धा आहे त्यांचे स्वागत आहे. अन्यथा हा परिसर पिकनिक स्पॉट नाही. ही विनंती नाही, इशारा आहे, विश्व हिंदू परिषद-बजरंग दल काशी.

हे पोस्टर्स विश्व हिंदू परिषदेचे (VHP) काशी महानगराचे मंत्री राजन गुप्ता यांनी पक्के घाट आणि गंगा घाटाच्या काठावर बांधलेल्या धार्मिक स्थळांच्या भिंतींवर लावले आहेत. वृत्तानुसार, राजन गुप्ता म्हणाले की, गैर-सनातनी धर्मासाठी लावले जाणारे हे पोस्टर्स केवळ पोस्टर्स नाहीत, तर एक चेतावणी संदेश आहेत.

राजन गुप्ता म्हणाले, गंगा घाट, मंदिरे आणि धार्मिक स्थळे ही सनातन धर्माच्या श्रद्धेची प्रतीके आहेत. आम्ही चेतावणी देऊ इच्छितो की गैर सनातनींनी आमच्या सनातन धर्माच्या धार्मिक स्थळांपासून दूर रहावे, कारण हे पिकनिक स्पॉट नाही. ज्यांची सनातन धर्मावर श्रद्धा आहे, आम्ही त्यांचे स्वागत करू, ज्यांना नाही, त्यांना हाकलून देण्याचे काम करू.

त्याचवेळी बजरंग दलाचे काशी महानगर संयोजक निखिल त्रिपाठी म्हणाले, हे पोस्टर नसून आपली चिरंतन माता गंगा हिला पिकनिक स्पॉट मानणाऱ्यांसाठी एक इशारा आहे. अशा लोकांनी आमच्या धार्मिक स्थळांपासून दूर राहावे. अन्यथा बजरंग दल त्यांना हाकलून देईल, असा इशारा पोस्टरच्या माध्यमातून देण्यात आला आहे.

काशीमध्ये बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेने असे काम केल्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी 25 डिसेंबरला शहरातील चर्चबाहेर हनुमान चालिसाचे पठण करण्यात आले होते. त्यानंतर 1 जानेवारीला वाराणसीतील मॉल आणि रेस्टॉरंट्सच्या बाहेर पाश्चात्य संस्कृतीशी संबंधित पार्टी साजरी न करण्याचा इशारा देणारे पोस्टरही लावण्यात आले आहेत.

महत्वाच्या बातम्या :-
कॉवेक्सिन घेतल्यानंतर पेनकिलर किंवा पॅरासिटामॉल घेऊ नका, भारत बायोटेकचा लोकांना सतर्कतेचा इशारा
महादेवाच्या कृपेने मोदी वाचले, ड्रोन किंवा टेलिस्कोपिक गनने त्यांची हत्या झाली असती; बड्या भाजप नेत्याचं वक्तव्य
‘या’ ५ शेअर्सनी गुंतवणूकदारांना केलं मालामाल, एका वर्षात दिला २८१% परतावा
बर्फाच्या वादळातही न डगमगता उभा आहे भारतमातेचा जवान, व्हिडिओ पाहून तुम्हीही ठोकाल सलाम