इंडियन आइडलच्या मंचावर सगळ्यांचे आईवडील हजर, सायली कांबळे मात्र एकटीच;कारण ऐकल्यावर सगळे लागले रडू

इंडियन आयडल सीझन १२ (Indian Idol 12) हा एक सुप्रसिद्ध टेलिव्हिजन शो आहे. शनिवार व रविवार रोजी बरीच मनोरंजन आणि हास्य घेऊन येत आहे. या खास वीकेंड शोमध्ये दर्शकांना देशातील काही उत्तम आवाज ऐकण्याची संधी मिळेलते. या शोमधील प्रत्येक स्पर्धकाने चाहत्यांच्या मनामध्ये घर केले आहे.

इंडियन आयडल या शोमध्ये येत्या शनिवार-रविवारी संगीत दिग्दर्शक अनु मलिक आणि गीतकार मनोज मुंतशिर पाहुणे म्हणून येणार आहेत.त्यामुळे या शोला रंगत चढणार आहे. या एपिसोड मध्ये स्पर्धकांचे आई-वडील देखील मंचावर उपस्थित राहणार आहेत आणि आपल्या मुलांना प्रोत्साहन देणार आहे.

या शोमधील स्पर्धक सायली कांबळे ही एकटीच दिसणार आहे. जेव्हा आदित्य नारायणने तिला विचारले की, टू एकटीच का आहेस? तुझे आई-वडील कुठ आहेत? या प्रश्नांवर तिने उत्तर दिले की, ती तिच्या वडिलांना खूप मिस करत आहे. मागील वर्षापासून तिचे तिच्या वडिलांशी नीट बोलणे सुद्धा होत नाही. कारण कोरानाच्या महामारीमध्ये तिचे वडील दिवस रात्र व्यस्त असतात.

सायली कांबळेचे वडील रुग्णांना ने-आणसाठी रुग्णवाहिका चालवतात. ते रुग्णांच्या सेवेसाठी सतत तत्पर असतात.त्यातून त्यांना घरच्यांना वेळ देता येत नाही. ते सतत पीपीई कीटमध्ये असतात त्यामुळे त्यांना घरच्यांना फोन करनही जमत नाही. या कारणामुळे सायली नेहमीच तिच्या वडलांची चिंता करत असते.

सायलीच्या या बोलण्यानंतर मंच्यावरील प्रत्येकजण भावूक झाला होता. सगळ्यांनी तिच्या वडलांची प्रशंसा केली आणि त्यांच्या कार्याला सलाम केला. तसेच आदित्य नारायण धीर देत म्हणाला की, तुझे वडील समाजासाठी खूप चांगले काम करत आहेत त्यांच्या या कार्यामुळे देव त्यांना चांगला आशीर्वाद देईल.

हे ही वाचा –

गायिका सुनिधी चौहानने आपल्या नवऱ्यासोबत सुरु असलेल्या वादावर सोडले मौन; म्हणा

ऑक्सिजन खूप कमी आहे, रुग्ण वाचणार नाहीत; रुग्णालयाचे सीईओ ढसाढसा रडले

करिअरमध्ये अक्षय,अजयपेक्षा मागे का राहिले सुनील शेट्टी; स्वतःच सांगितले ‘ते’ कारण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.