सलमान खानच्या हत्येचा कट, आरोपीला हरीयानात अटक; बॉलीवूड हादरले

फरीदाबाद । अभिनेता सलमान खानच्या हत्येचा कट पोलिसांनी उधळला आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

या आरोपीने सलमानची माहिती गोळा करण्यासाठी रेकी केली होती. सलमान खान कुख्यात लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या रडारवर असल्याची माहिती देखील आता समोर येत आहे.

माहितीनुसार फरीदाबाद पोलिसांनी भिवानी जिल्ह्यातील असलेल्या 27 वर्षीय राहुल संगा उर्फ ​​बाबाला अटक केली आहे. सध्या तो हरियाणामधील हिस्सारमध्ये राहत होता.

अनेक गुन्ह्यांमध्ये तो सहभागी होता. त्याला चौकशीसाठी फरीदाबाद इथे आणण्यात आले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, लॉरेन्स बिष्णोईच्या टोळीतील राहुल यावर्षी जानेवारी महिन्यात मुंबईच्या वांद्र्यात गेला होता, जिथे सलमान खानचे घर आहे.

माहितीनुसार राहुलने सलमान खानची आणि हालचालांची तीन दिवस रेकी केली होती. काळवीट शिकारी प्रकरणात सुटका झाली म्हणून सलमान खान निशाण्यावर होता. यासाठी त्याने मागील वर्षी एका गँगस्टरलाही सलमानच्या मागावर पाठवले होते.

पोलिसांनी शार्प शूटर राहुलची इतर प्रकरणांमध्ये मदत केल्याच्या आरोपात इतर चार जणांनाही अटक केली आहे. याआधी जून महिन्यात हरियाणा पोलिसांनी एका शार्पशूटरला हैदराबादमधून अटक केली होती.

राहुलने यापूर्वी अनेक हत्याकांड केले आहेत. पोलिसांनी त्याच्याकडून अनेक वस्तू जप्त केल्या आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.