‘साजिशे लाखो बनती हैं मेरी हस्ती मिटाने के लिए….’ निकालानंतर छगन भुजबळांचा शायराना अंदाज

मुंबई। ८०० कोटींच्या कथित महाराष्ट्र सदन घोटाळ्या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह ८ जणांना क्लीन चीट दिल्यानंतर त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सत्य परेशान हो सकता है पराजित नही, असे म्हणत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणाच्या आरोपातून छगन भुजबळांचं नाव वगळण्यात आलं आहे. छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात दोन वर्ष तुरुंगात शिक्षा भोगावी लागली होती. मात्र आज भुजबळ निर्दोष असल्याचे स्पष्ट झाले आहे. याचदरम्यान भुजबळांनी पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका स्पष्ट केली.

यावेळी भुजबळांचा शायरी अंदाज पाहायला मिळाला. साजिशे लाखो बनती हैं मेरी हस्ती मिटाने के लिए…ये जनता की दुवाऐं है उन्हे मुक्कमल नहीं होने देती…. अशी शेरेबाजी करत भुजबळांचा पुन्हा एकदा शायराना अंदाज दिसून आला आहे. आज दुखाचा पाढा वाचणार नाही. पण तुमचा भुजबळ करु असे बोलणाऱ्यांनाही न्यायालयाने उत्तर दिले आहे.

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात आमच्यावर खोटेनाटे आरोप करण्यात आले. कंत्राटदाराला १ ही पैसा दिल्याचं विरोधी पक्षाला सिद्ध करता आलं नाही. तक्रारदाराला १ फुट जमीन किंवा एफएस आय मिळाली नाही, तरीही आमच्यावर आरोप करण्यात आले, ८०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे आरोप करण्यात आले.

ईडी, सीबीआयची केस झाली, २६ महिने तुरुंगात रहावं लागलं. पण आज न्यायालयाचा निर्णयाचा आम्ही विनम्रपुर्वक स्विकार आहोत. द्वेष तक्रार नाही. असे म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

तसेच त्यांनी पवारसाहेबांचे आभार…. जयंतराव-अजितदादांचे आभार… मला मंत्रिमंडळात घेतलं, उद्धवजींचेही आभार, कठीण काळात माझ्यामागे आणि कुटुंबामागे उभे राहिलेल्या प्रत्येकाचे आभार भुजबळ यांनी मानले. तसेच “कोर्टाच्या निर्णयानंतर ताबडतोब पवारांना सांगणं अपेक्षित होतं, मुख्यमंत्री हे माझ्या मंत्रिमंडळाचे प्रमुख आहेत, त्यांचनीही आनंद व्यक्त केलं.

आज समाधानाची बाब आहे, पण काही लोक मला झोपू देणार नाहीत हे मला माहिती आहे पण कितीही प्रयत्न केले तरी मी शांत झोपणार आहे”, अस भुजबळ म्हणाले आहेत. त्यामुळे भुजबळांचा आनंद या पत्रकार परिषदेत मावेनासा झाला असल्याचे पाहायला मिळाले.
महत्वाच्या बातम्या
काहीही झालं तरी पाचव्या सामन्यात ‘या’ खेळाडूला बाहेर बसवू नका; गावस्करांचा टिम इंडीयाला सल्ला
नवरा असुदे कारागृहात, बाप्पाचे आगमन होणार थाटामाटात, अभिनेत्री शिल्पा शेट्टीकडे बाप्पा होणार विराजमान
..आणि त्याने आपल्या सर्व मित्रांना घरी बोलावले व सर्वांना ७-७ कोटी रूपये दिले, वाचा मैत्रीची अनोखी कहाणी
विजय देवराकोंडाने दिलेला शब्द पाळला, इंडियन आयडलच्या शन्मुखप्रिला लाइगरमध्ये गाणं गाण्याची संधी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.