“हेमंत करकरे यांना आपण देशभक्त मानत नाही, त्यांना त्यांच्या पापाची शिक्षा दहशतवाद्यांनी दिलीय”

भाजप खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यापूर्वी देखील त्यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. आता त्यांनी मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांच्याबाबत एक वक्तव्य केले आहे. यामुळे त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे.

त्या म्हणाल्या, हेमंत करकरे हे काही लोकांसाठी देशभक्त असतील, मात्र मी करकरेंना देशभक्त मानत नाही असे प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणाल्या आहेत. हेमंत करकरे यांना काही लोक देशभक्त मानतात. पण खरे देशभक्त असलेले लोक त्यांना देशभक्त मानत नाहीत. देशासाठी मी माझे जीवन समर्पित केले आहे.

माझ्यासारख्या स्वयंसेवकाला त्यांनी त्रास दिला, असेही त्या म्हणाल्या. याबाबत त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. देशात एक आणिबाणी १९७५ साली लागली होती. तशाच प्रकारची आणखी एक आणिबाणी ही २००८ साली लागल्याचं सांगत आपल्याला या प्रकरणात गोवण्यात आल्याचा आरोपही प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केला.

आपल्याला शिक्षण देणाऱ्या आचार्यांच्या हाताची बोटं, हाडे मोडली, तोडली. मला खोट्या प्रकरणात अडकवले, असे त्या म्हणाल्या. यामुळे आता त्या वादात सापडल्या आहेत. मात्र त्यांनी या अगोदर देखील अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. त्या सतत चर्चेत असतात.

आपल्या शापामुळेच महाराष्ट्र केडरचे आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांचा मृत्यू झाल्याचे प्रज्ञा यांनी यापूर्वी म्हटले होते. हेमंत करकरे यांना केंद्र सरकारने अशोक चक्र देऊन सन्मानित करण्यात आले होते. २००८ मध्ये मुंबईत झालेल्या अतिरेकी हल्ल्यात हेमंत करकरे हे शहीद झाले होते. तर खासदार प्रज्ञा सिंह ठाकुर या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आहेत.

त्यांनी पुन्हा एकदा म्हटले आहे की आपण हेमंत करकरे यांना देशभक्त मानत नाही. त्याना त्यांच्या पापाची शिक्षा दहशतवाद्यांनी दिली. यामुळे आता चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणी त्या अडचणीत येण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

अमेरिकन टॉम अल्टरचा जन्म झाला होता भारतात; चित्रपटांमध्ये विदेशी खलनायक बनून अभिनेत्यांना दिला त्रास

SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! १ जुलैपासून होणार कॅश विथड्रॉल आणि चेकबुकच्या नियमात बदल; जाणून घ्या…

पतीचा मोबाईल बंद असल्याने बायको गेली शोधायला, पण पुढे जे झालं ते पाहून बायको हादरली

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.