सिद्धूने इम्रानला मोठा भाऊ म्हणल्याने संतापला काँग्रेसचा बडा नेता; म्हणाला कश्मीरमध्ये सैनीक शहीद होताहेत..

पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष ‘नवज्योत सिंग सिद्धू’ यांनी शनिवारी करतारपूरला जाऊन त्यांच्याशी संबंधित वादाला जन्म दिला. यादरम्यान सिद्धूने पाकिस्तानचे पंतप्रधान ‘इम्रान खान’ हे आपला मोठा भाऊ असल्याचे सांगितले. सिद्धूंच्या या वक्तव्यावर विरोधकांनी तर गोंधळ घातलाच, पण आता काँग्रेस नेतेही सिद्धू यांच्यावर टीका करत आहेत.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार ‘मनीष तिवारी’ यांनी शनिवारी सांगितले की, इम्रान खान हा कुणाचा तरी भाऊ असू शकतो, पण भारतासाठी तो या यंत्रणेचा भाग आहे, जो पंजाबमध्ये शस्त्रे आणि अंमली पदार्थ पाठवतो. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना पाठवतो. पूंछमधील आपल्या जवानांचे बलिदान आपण इतक्या लवकर विसरलो का?

मनीष तिवारी यांनी सिद्धू किंवा काँग्रेसच्या धोरणांवर टीका करण्याची ही पहिलीच वेळ नाही. पंजाब काँग्रेसच्या वादावरून त्यांनी काँग्रेस नेत्यांवरही निशाणा साधला आहे. काही दिवसांपूर्वीच राहुल गांधी यांच्या हिंदू धर्म आणि हिंदुत्वावरील चर्चेवर निशाणा साधत म्हटले होते कि, मी या वादामुळे कंफ्यूज होत आहे.

आदल्या दिवशी, सिद्धूने पाकिस्तानच्या कर्तारपूर साहिब गुरुद्वारामध्ये प्रार्थना केली “दोन्ही देशांमधील मैत्रीचा नवीन अध्याय उघडण्यासाठी.” कोविडच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी मार्चमध्ये गुरुद्वाराची तीर्थयात्रा स्थगित करण्यात आली होती. करतारपूर कॉरिडॉर मंगळवारी यात्रेकरूंसाठी पुन्हा खुला करण्यात आला आहे.

२० महिन्यांच्या कालावधीनंतर करतारपूर साहिब कॉरिडॉर पुन्हा उघडल्यानंतर पाकिस्तानच्या इम्रान खान सरकारने सिद्धू यांच्या भूमिकेचे कौतुक केले आहे. सिद्धू यांना पंजाबचे मुख्यमंत्री ‘चरणजीत चन्नी’ यांच्या नेतृत्वाखाली १८ नोव्हेंबरला गुरुद्वाराला भेट देणार्‍या बॅचमधून बाहेर ठेवण्यात आले होते.

सिद्धू  यापूर्वीही पाकिस्तान आणि इम्रान खान यांच्याबाबत वादात सापडले आहेत. इम्रान खान सरकारच्या शपथविधी सोहळ्याला भाजपनेही सिद्धू यांच्यावर निशाणा साधला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.