…तर काँग्रेसने सरकारचा पाठिंबा काढावा! रामदास आठवले यांच्या वक्तव्याने खळबळ

मुंबई । राज्यात तीन पक्षांचे मिळून महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात आले आहे. मात्र सरकारमध्ये सर्व काही ठीक नसल्याचे अनेकदा दिसून आले आहे. तसेच सरकार लवकरच पडेल, असे देखील भाजपकडून सांगितले जाते. यावर सतत राजकीय टीका टिप्पणी सुरू असते.

काही दिवसांपासून काँग्रेसने विधानसभा आणि स्थानिक स्वराज संस्था निवडणुकांमध्ये स्वबळाचा नारा दिला आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार येऊन १ वर्ष सात महिने झाले असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. यामुळे हे सरकार टिकणार का? याबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे.

आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नाना पटोले आणि काँग्रेसला एक सल्ला दिला आहे. फक्त इच्छा व्यक्त करून चालणार नाही तर काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्री पदाचा आग्रह धरला पाहिजे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे काँग्रेसच्या पाठिंब्यावर तरलेले सरकार आहे.

जर काँग्रेसने पाठिंबा काढला तर महाविकास आघाडी सरकार पडेल.  त्यामुळे काँग्रेसने मुख्यमंत्री पदाचा  आग्रह धरला पाहिजे जर काँग्रेसला मुख्यमंत्रीपद दिले जात नसेल तर काँग्रेसने महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढावा, असेही आठवले यांनी सांगितले आहे.

यामुळे आता काँग्रेस काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीत अनेक कारणाने सतत वाद सुरु असतात. अनेक मतदार संघात देखील कार्यकर्ते एकमेकांशी वाद घालत असतात. यावरून अनेक मंत्री आमदार हे एकमेकांवर टीका देखील करत असतात.

यामुळे ही आघाडी किती दिवस टिकणार यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त करणारा व्हिडीओ व्हायरल झाला त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. यामुळे हा वाद सुरू झाला होता.

या मराठमोळ्या मुलीच्या तलवारबाजीपुढे भले भले योद्धे घायाळ होतील; पहाच एकदा व्हिडिओ

उषा नाडकर्णी यांनी सुशांतच्या आत्महत्येबद्दल केला मोठा खुलासा; म्हणाल्या तो…

‘पुन्हा शेपमध्ये येण खरच अवघड आहे का? नुकतच मातृत्व अनुभवलेल्या धनश्री कडगावकरने स्त्रियांना दिला मोलाचा सल्ला

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.