Share

महाविकास आघाडी सरकारमध्ये बदल होणार, नाना पटोलेंच्या विधानामुळे राजकारणात खळबळ

patole-uddhav-thakre-sharad-pawar

काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये बदल होणार आहेत, असे विधान करत राजकीय भूकंपाचे संकेत दिले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांच्या विधानामुळे राज्य सरकारमध्ये मोठा बदल घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. १० मार्चनंतर सरकारमध्ये बदल होतील, असे नाना पटोले यांनी सांगितले आहे.(congress state leader nana patole big statement on mahvikas aghadi sarkar)

भंडारा येथे काँग्रेस पक्षाने एक जाहीर सभेचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी राजकीय भूकंपाचे संकेत दिले. पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर १० मार्चनंतर राज्य सरकारमध्ये बदल होणार आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे, असे नाना पाटोले यांनी सांगितले.

“आता सरकारमध्ये दुरुस्ती करण्याची वेळ आली आहे”, असे विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी जाहीर सभेत केले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. त्यामुळे १० मार्चनंतर सरकारमध्ये नक्की कोणता बदल होणार आहे, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

या जाहीर कार्यक्रमात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले म्हणाले की, “लवकरच राज्य सरकारमध्ये बदल दिसतील. सध्या राज्यात जे काही सगळे सुरु आहे, ते लवकरच दुरुस्त करायचे आहे.” काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोलेंनी राजकीय भूकंपाचे संकेत दिले आहेत. नाना पाटोलेंच्या विधानामुळे राजकीय खांदेपालट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गोवा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि पंजाब या पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली आहे. या निवडणुकांचा येत्या १० मार्चला निकाल लागणार आहे. या पाच राज्यांच्या निवडणूका काँग्रेस पक्षासाठी महत्वाच्या आहेत. काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील जवळपास १३ पालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील मंत्री मंडळात बदल केले जाणार आहेत का? असा प्रश्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोलेंच्या विधानामुळे जनतेला पडला आहे. राज्य मंत्रिमंडळात महत्वाचे बदल होण्याचे संकेत नाना पाटोलेंच्या विधानामुळे निर्माण झाले आहेत. आता १० मार्चनंतर सरकारमध्ये नक्की कोणते बदल होतात, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

महत्वाच्या बातम्या:-
संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेनंतर उद्धव ठाकरेंनी ‘या’ बड्या नेत्याला केला फोन, राजकीय वर्तुळात खळबळ
बप्पी लहरींच्या या गाण्याचा मायकल जॅक्सनही होता फॅन, गळ्यातील सोनं पाहून म्हणाला होता..
बप्पी लहरींच्या निधनावर पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केलं दुःख; ट्विट करत म्हणाले..

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now