“काँग्रेसने महाराष्ट्रात ‘हातात’ ‘धनुष्यबाण’ धरला, त्याचा ठासून फटका बिहारमध्ये बसला”

मुंबई । बिहारमध्ये NDA चा विजय झाला आहे. यामुळे भाजप कार्यकर्ते आनंदात आहेत. यामुळे अनेकांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे.

या विजयानंतर भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, काँग्रेसने महाराष्ट्रात ‘हातात’ ‘धनुष्यबाण’ धरला, त्याचा ठासून फटका बिहारमध्ये बसला. काँग्रेसला मोठा फटका बिहारमध्ये बसला आहे.

आता महाराष्ट्रातदेखील जनतेच्या ‘घड्याळाचे’ काय सांगावे टायमिंग…? पंचायत ते पार्लमेंट मॅन ऑफ द मॅच पंतप्रधान नरेंद्र मोदीच! त्यांच्यासह नितीश कुमारजी, देवेंद्रजीं फडणवीस यांचे अभिनंदन, असे ट्विट करत शेलार यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

भ्रष्टाचारी काँग्रेससोबत सलगी केलेलेल्या ‘जगंलराज का युवराज’ला बिहारच्या जनतेनं नाकरले. महाराष्ट्रात पण भ्रष्टाचारी काँग्रेससोबत ‘जंगलाचे बेगडी प्रेमी युवराज’ युती करुन बसलेत. समजनेवाले को इशारा काफी है, असेही ते म्हणाले.

बिहारमध्ये देवेंद्र फडणवीस हे प्रभारी म्हणून काम करत होते. यामुळे आशिष शेलार यांनी त्यांची भेट घेऊन अभिनंदन केले. या निवडणुकीत काँग्रेसला मोठा फटका बसला. ही निवडणूक अटीतटीची ठरली.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.