Share

Rahul Gandhi : कोणावर बेनामी संपत्तीचा आरोप, कोणाच्या घरात किलोने सोनं सापडलं, कोणी परीक्षा घोटाळ्याचा आरोपी, 10 जण भाजपत; राहुल गांधींविरोधात पत्र लिहिणाऱ्या 272 जणांची कुंडली आली बाहेर!

Rahul Gandhi : देशभरातील १६ माजी न्यायाधीश, १२३ निवृत्त नोकरशहा (१४ माजी राजदूतांसह) आणि १३३ वरिष्ठ निवृत्त लष्करी अधिकारी अशा एकूण २७२ जणांनी अलीकडेच एक खुले पत्र प्रसिद्ध केले होते. या पत्रात राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच काँग्रेस संवैधानिक व्यवस्थांवर अविश्वास निर्माण करत असल्याचा दावा त्या पत्रात करण्यात आला होता.

या पत्रानंतर काँग्रेसने या २७२ जणांपैकी अनेकांच्या सेवाकाळात नोंद झालेल्या तक्रारी, चौकशा, तसेच पदसिद्ध लाभांबाबतची माहिती सोशल मीडियावर मांडली. ही माहिती काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी ट्विटच्या मालिकेत प्रसिद्ध केली. त्यांच्या दाव्यानुसार या यादीत बेनामी संपत्ती, घरातून सोनं सापडल्याची चौकशी, परीक्षा घोटाळे, तसेच राजकीय पदांचा लाभ असे अनेक मुद्दे समोर येतात.

आदर्श कुमार गोयल यांच्यावरील आरोप काँग्रेसचे दावे

काँग्रेसने नमूद केले की आदर्श कुमार गोयल यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून काम केले, परंतु २००१ च्या आयबी अहवालात त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे संशय व्यक्त करण्यात आल्याचा दावा काँग्रेसने केला. तरीही त्यांची पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयात नियुक्ती झाली. २०१८ मध्ये केंद्र सरकारने त्यांना राष्ट्रीय हरित अधिकरणच्या अध्यक्षपदी नेमले. तसेच हरियाणा सरकारने त्यांच्या मुलाची उच्च पगारासह अतिरिक्त अॅटर्नी जनरल म्हणून नियुक्ती केल्याचाही उल्लेख करण्यात आला. काँग्रेसचा आरोप आहे की अशा लाभांच्या बदल्यात त्यांनी राहुल गांधीविरोधातील पत्रावर स्वाक्षरी केली.

भाजपमध्ये प्रवेश केलेल्या १० अधिकाऱ्यांची यादी (काँग्रेसचे दावे)

सुप्रिया श्रीनेत यांनी दिलेल्या माहितीनुसार खालील १० जण सध्या भारतीय जनता पक्षामध्ये आहेत—न्यायमूर्ती पी. एन. रवींद्रन
संजीव त्रिपाठी– माजी रॉ प्रमुख
अय्यर कृष्णा राव – माजी मुख्य सचिव, आंध्र प्रदेश
भास्वती मुखर्जी – माजी राजदूत
टी. पी. सेनकुमार  – माजी डीजीपी, केरळ
निर्मल कौर  – माजी डीजीपी, झारखंड
बी. एच. अनिलकुमार – माजी मुख्य सचिव, कर्नाटक
भास्कर राव  – माजी अतिरिक्त डीजीपी, कर्नाटक
ले. ज. डी. पी. वत्स
मेज. ज. पी. सी. खरबंदा

काँग्रेसचा दावा आहे की या अधिकाऱ्यांवर विविध आरोप किंवा तपासाच्या नोंदी असून त्यापैकी अनेकांना सत्तासंबंधित लाभ मिळाल्यानंतरच त्यांनी या पत्राला पाठिंबा दिला.

 

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now