‘मोदी म्हणतात सर्वांना लस मिळणार, सरकार म्हणतं म्हणालोच नाही; नक्की काय?’

मुंबई | देशात कोरोना विषाणूचा हाहाकार सुरु आहे. कोरोनावरील लस अजूनही बाजारात आलेली नाहीये. अमेरिका, ब्रिटनमध्ये तर कोरोना लसीकरण सुरु करण्यास मान्यताही देण्यात आली आहे. यामुळे आता आता कोरोनावर लसी येत असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

तर आपल्याकडे केंद्र सरकारने कोरोनावरील कोणत्याही लसीला अद्याप मंजुरी दिलेली नाही. मात्र लसीकरणाची तयारी केली जात आहे. तब्बल 30 कोटी लोकांना कोरोनावरील लस देण्याची तयारी केली जात आहे. तर दुसरीकडे आरोग्य मंत्रालयाने प्रत्येक भारतीयाला लस देण्याबद्दल सरकारकडून म्हटले गेलेलं नाही, असे स्पष्ट केले आहे.

आता यावरून कॉंग्रेसने मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. राहुल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट करत म्हणतात,  ‘सर्वांना कोरोना लस देणार असं मोदी म्हणाले पण सरकार म्हणतं म्हणालोच नाही; नक्की भूमिका काय?” असे म्हणत राहुल गांधींनी सवाल उपस्थित केला आहे.

तसेच पुढे ते म्हणतात, ‘पंतप्रधान म्हणतात सर्वांना लस मिळणार. बिहार निवडणुकांच्या वेळी बिहारमध्ये सर्वांना मोफत कोरोना लस दिली जाणार असल्याचे म्हटले. आता केंद्र सरकार म्हणतं सर्वांना लस देणार असे कधी म्हटलंच नाही. पंतप्रधानांची नक्की भूमिका काय?” असा सवाल त्यांनी केला आहे.

कोरोना लस वाटपासाठी मोदी सरकारने तयार केला प्लॅन…
कोरोना लस वेळेत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार आरखडा तयार करण्याच्या तयारीत आहे. सरकार प्रत्येक राज्यात ब्लॉक स्तरावर ब्लॉक टास्क फोर्स तयार करेल. याबाबत बुधवारी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

महत्त्वाच्या बातम्या
डॉ. शीतल आमटे – करजगी यांच्या मृत्युच्यादिवशी नेमकं काय घडलं होतं? घ्या जाणून
हेमा मालिनी- धर्मेंद्र पुन्हा झाले आजी-आजोबा; घरात एकाच वेळी डबल धमाका
‘एमडीएच’ मसालेचे मालक धर्मपाल गुलाटी यांचं निधन

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.