…म्हणून आमचा लॉकडाऊनला विरोध; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याने मुख्यमंत्री ठाकरेंचे टोचले कान

मुंबई : नव्या कोरोना रुग्णांचा राज्यातील वाढता आकडा पाहता आता याचा ताण आरोग्य यंत्रणांवर येऊ लागला आहे. रुग्णसंख्येत दिवसेंदिवस झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे बेड्स आणि इतर आरोग्य सुविधाही अपुऱ्या पडू लागल्या आहेत. अशातच ठाकरे सरकारकडून लॉकडाउन लावलं जातंय की काय अशी चर्चा सुरु आहे.

तर दुसरीकडे राष्ट्रवादी पाठोपाठ कॉंग्रेसने ही लॉकडाऊनला तीव्र विरोध दर्शविला आहे. काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी लॉकडाउनवरुन संताप व्यक्त केला आहे. ‘चुकीचं नियोजन आहे. पुन्हा लॉकडाउन लागू करण्याचा जो विचार सुरु आहे त्याला आमचा विरोध आहे,’ असे त्यांनी म्हंटले आहे.

“कारण गेल्या वर्षी जो लॉकडाउन लागू केला होता त्यामुळे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशात लोकांना बेराजगारीचा सामना करावा लागला होता. कारखाने बंद झाले होते आणि व्यवसायावर मोठा परिणाम झाला होता,” असे निरुपम म्हणाले आहेत.

‘…तर लॉकडाऊनबाबत नियोजन करा’
राज्यातील करोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे इतर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्याचे चित्र असून आज झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत लॉकडाऊनसारखे अतिशय कडक निर्बंध त्वरित लावण्यात यावेत अशा सूचना देण्यात आल्या.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, ‘एकीकडे आपण कोविड परिस्थितीतही अर्थव्यवस्था सुरु राहील याचा आटोकाट प्रयत्न करतोय मात्र अनेक घटक अजूनही ही गोष्ट गांभीर्याने घेत नाहीत. अजूनही खासगी कार्यालयातून उपस्थिती नियमांचे पालन होत नाही, विवाह समारंभ नियम तोडून सुरु आहेत, मास्क याचे पालन होताना दिसत नाही.’

तसेच पुढे ते म्हणाले, ‘लोकांच्या आरोग्याचे संरक्षण करणे याला  आमचे प्राधान्य आहे. त्यामुळे अतिशय कठोरपणे नियमांचे पालन करावे अन्यथा लॉकडाऊन करावं लागेल असे समजून धान्य पुरवठा, औषधी, अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सुविधा यांचे नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

महत्त्वाच्या बातम्या 

एवढ्या वर्षांनंतर पद्मिनी कोल्हापूरेने केला खुलासा; ‘या’ कारणामुळे हिट चित्रपटाला दिला होता नकार

‘पवारसाहेब काळजी करु नका, पंढरपूरचा कार्यक्रम आमचा आम्ही करतो’

कारच्या धडकेने रिक्षातील CNG चा भयानक स्फोट, ४ जण जागीच ठार; पहा भयानक व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.